लायन्स क्लब ऑफ औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार, मनपाच्या 15 शिक्षकांना जाहिर...

 0
लायन्स क्लब ऑफ औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार, मनपाच्या 15 शिक्षकांना जाहिर...

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चा आदर्श शिक्षक पुरस्कार मनपाच्या 15 शिक्षकांना जाहीर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) -

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद व मनपा शाळा गारखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका प्राथमिक शाळा गारखेडा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यास महानगरपालिकेचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे हे प्रमुख पाहुणे होते. त्याचबरोबर माजी सचिव तथा शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचीही या समारोहास उपस्थिती होती. शहरातील तसेच ग्रामीण भागातील व मनपाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या 15 शिक्षकांची

यामध्ये निवड करण्यात आली. यामध्ये अतुल हेळसकर, डॉ. विनोद सीनकर, आप्पासाहेब पवार, योगिता कठाळे ,मीना गजभिवं, ममता सुलताने, देविना पटेल, वैशाली कंकाल, वैशाली खंदारे, सईद अमजद्दीन कादरी, हुमेरा बेगम ,सत्यशीला गवळे, अस्मिता अंभोरे ,साधना क्षत्रिय व संदीप वाकडे या सर्व शिक्षकांना लायन्सच्या उपस्थितीत गारखेडा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वयन लायन्स माधुरी चौधरी व शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी केले. या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ औरंगाबादचे ला.तनसुख झांबड, विनोद अग्रवाल, मनीष बंग, माधुरी चौधरी, महेंद्र चौधरी, आशा कटके, मयूर जालनावाला, गोपाल सारडा, निखिल सारडा, पृथ्वीराज पवार, भगवानदास काबरा ,अशोक रुणवाल ,मारुती फुलारी, मसूद्दीन सय्यद ,ओमप्रकाश अग्रवाल, ऋषिकेश ग्रेवाल सतीश अग्रवाल, दीपक भारदिया, नेहा अग्रवाल,भावना तोतला उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow