समांतर पाणी योजनेचा महानगरपालिकेचा हिस्सा राज्य सरकारने उचलावा...!

समांतर पाणी योजनेचा महानगरपालिकेचा हिस्सा राज्य सरकारने उचलावा
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई, दि.11(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी जाहीर झालेल्या समांतर पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत नसल्याने राज्य सरकारने महानगरपालिकेचा आर्थिक हिस्सा उचलावा, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज परिषद सभागृहात केली.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समांतर पाणी योजनेसाठी 800 कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्याचे जाहिर केले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर या सरकारने महानगरपालिकेला सॉफ्ट लोन देण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या आर्थिक वर्ष 2025-26 च्या अर्थसंकल्पात सदरील कर्ज देण्यासाठी कसलीच तरतूद करण्यात आली नसल्याची, टीका दानवे यांनी राज्य सरकारवर केली. समांतर पाणी योजनेचा महानगरपालिकेचा हिस्सा राज्य सरकारने उचलावा
अशी मागणी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
What's Your Reaction?






