उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार, पर्यायी रस्त्याचा वापर करावा...!
उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार, पर्यायी रस्त्याचा वापर करावा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) उद्या शहरात 134 वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार आहे. यासाठी शहरात भव्य मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मिरवणूका भडकलगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येणार आहे. येथे सकाळपासून अभिवादनासाठी गर्दी होणार आहे. नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी शहर पोलिसांच्या वतीने काही रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. सार्वजनिक वाहतूक पर्यायी रस्त्यावर वळवण्यात येणार आहे. उद्या 14 एप्रिल रोजी सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हे रस्ते बंद राहणार आहे.
महावीर चौक ते अमरप्रित चौक, गोपाल टि ते क्रांतीचौक, सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, सुपारी हनुमान मंदिर, सिटीचौक, जुना बाजार, हेड पोस्ट ऑफिस, भडकलगेट,
औरंगपुरा पोलिस चौकी, बाराभाई ताजीया, मिल काॅर्नर, सिटी क्लब, सिडको परिसरातील मार्ग एन-12, एन-9, अयोध्यानगर, शिवनेरी काॅलनी, एन-7 शाॅपिंग सेंटर मार्ग एकेरी करण्यात येईल.
पर्यायी मार्ग...
जळगाव व जालना मार्गावरील वाहने हर्सूल टि पाॅईंट, जालना रोड, अमरप्रित चौक, दर्गा चौक, गोदावरी टि पाॅईंट, रेल्वे स्टेशन चौक.
शहानूरवाडी, भाजीवाली बाई पुतळा, गाडे चौक, देवगिरी महाविद्यालयात.
सावरकर चौक, निराला बाजार, औरंगपुरा, चेलीपुरा, महानगरपालिका कार्यालय मार्ग, दिल्लीगेट, सिटी क्लब, टाऊनहाॅल उड्डाणपूल खालून, विद्यापीठ मार्ग रस्त्याचा पर्यायी मार्गाचा वापर वाहतूकीसाठी करु शकतात.
पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मुभा असेल. बंद मार्गावर मिरवणुकीतील देखावे व शारीरिक मिरवणूक वाहनांना अपवाद, नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
What's Your Reaction?