चिकलठाण्यात 490 अतिक्रमण निष्कासित...
 
                                 
 
 
 
जालना रोड कारवाई: 490 अतिक्रमण निष्कासित
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) प्रशासक श्री.जी श्रीकांत आणि अतिरिक्त आयुक्त श्री.संतोष वाहुळे
नगररचना विभागाचे उप संचालक श्री.गर्जे, यांञिकी विभागाचे श्री.अमोल कुलकर्णी पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त श्री रणजीत पाटील, यांच्या उपस्थितीत केंब्रिज चौक ते चिकलठाणा गाव दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण 490 एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड,कंपाऊंड, ओटे, गॅरेज,वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलक, इ. निष्कासित करण्यात आले आहेत.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या 350 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे 400 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी 20 जेसीबी, 5 पोकलॅन, 15 टिप्पर, 2 रूग्णवाहिका, 2 कोंडवाडा वाहने, 2 अग्निशमन बंब, 4 इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहूल जाधव, नईम अन्सारी
इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज यमवार नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.
कारवाई मध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 इसमांविरूध्द गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. तसेच तब्बल 6 कोटी रूपयांच्या गुंठेवारी कायद्याअंतर्गत मालमत्ता नियमितीकरणाची नोटीसेस देण्यात आल्या आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            