सिटी क्लबच्या उपाध्यक्ष पदी भावेश सराफ, संचालक शाहनवाज खान आले निवडून

 0
सिटी क्लबच्या उपाध्यक्ष पदी भावेश सराफ, संचालक शाहनवाज खान आले निवडून

सिटी क्लबच्या उपाध्यक्ष पदी भावेश सराफ, संचालक शाहनवाज खान आले निवडून

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) सिटी क्लब स्थाई अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी क्लबची वार्षिक सभेनंतर अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भावेश सराफ व इतर मॅनेजिंग कमिटी सदस्यांचे पॅनल पूर्ण बहुमताने निवडून आले आहेत. निवडणुकीत उपाध्यक्ष पदी भावेश सराफ, सचिवपदी मोहम्मद फैय्याज, सहसचिव पदी अय्याज सिद्दीकी, मॅनेजिंग कमिटीचे संचालक म्हणून उमेश डबरी, डॉ.गुमास्ते माधव, अॅड गोपाळ पांडे, माजी नगरसेवक शहानवाज खान, संभाजी अतकरे, मिर्झा मसूद अस्लम, पंकज कन्हैयालाल, रुमी प्रिंटर, संजय भंडारी, सुरेश झांबड, डॉ.विजय मेहेर विजयी झाले आहेत.

निकाल लागताच सदस्यांनी जल्लोष करुन अभिनंदन केले. सिटी क्लबची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत चांगल्या प्रकारे सिटी क्लबचे जेष्ठ सदस्य ए.जी.खान, मोहन मेहता, नदीम अहेमद यांनी करुन निकाल घोषित केला असल्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या वतीने पॅनल प्रमुख व सिटी क्लबचे नवीन उपाध्यक्ष भावेश सराफ यांनी आभार मानले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow