एमआयएमची दलित नगरसेवकाला महापौर पदाचा उमेदवार बनवून राजकीय खेळी, संजय शिरसाट यांना केले आवाहन...
एमआयएमची दलित नगरसेवकाला महापौर पदाचा उमेदवार बनवून राजकीय खेळी, संजय शिरसाट यांना केले आवाहन
बडनेराच्या नगरसेविकेवर कार्यवाही होणार, मालेगावात शिंदे सेना सोबत जाणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. भाजपाने समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली आहे. तर राजकीय खेळी करत एमआयएमने प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आलेले दलित नगरसेवक अशोक हिवराळे यांना उमेदवारी दिली आहे तर उपमहापौर पदासाठी वसिम अहेमद यांना उमेदवारी दिल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे. महापौर पदाच्या खुर्चीवर दलित महापौर बसावा अशी एमआयएमची इच्छा आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पक्षाला बाजूला करत शिवसेनेची मते हिवराळे यांना दिली तर महापौरांच्या खुर्चीवर दलित समाजातील नगरसेवक बसू शकतो यासाठी उबाठा, वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. भाजपा व शिवसेनेला आव्हान देण्यासाठी एमआयएमने हि निवडणूक बिनविरोध न होऊ देता आपला उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. आता बघावे लागेल भाजपा व शिवसेनेला हि निवडणूक किती सोपी जाते 10 फेब्रुवारीला कळेल.
What's Your Reaction?