यापुढे अतिक्रमण कार्यवाईत जप्त केलेले सामान नष्ट करणार...मनपाचा अतिक्रमण धारकांना इशारा
यापुढे अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले सामान नष्ट करण्यात येणार...
महानगरपालिकेचा अतिक्रमण धारकांना इशारा...
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने यापुढे अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले सामान नष्ट करण्यात येणार आहे. या सामानाचा परत वापर होऊ नये व अतिक्रमण धारकांना चपराक बसावी यासाठी जप्त करण्यात आलेले सर्व सामान नष्ट करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे व उप आयुक्त सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहिम यशस्वी पणे राबविण्यात येत आहे.
आयुक्त यांच्या आदेशानुसार आता अतिक्रमण कारवाई वेळी जप्त केलेले सामान नष्ट करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळेस अतिक्रमण पथका द्वारे कारवाई केल्या नंतर पुन्हा अतिक्रमण धारक त्याच ठिकाणी अतिक्रमण करून नियमांचे उल्लंघन करतात. याची दखल घेत मनपाच्या वतीने जप्त केलेले सामान नष्ट करण्यात येणार आहे. याची अतिक्रमण धारकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. झालेल्या नुकसानीस महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही असे प्रशासनाचे वतीने कळविण्यात आले आहे.
What's Your Reaction?