उबाठाच्या गटनेतेपदी एकमताने गणेश लोखंडे यांची निवड...

 0
उबाठाच्या गटनेतेपदी एकमताने गणेश लोखंडे यांची निवड...

उबाठाच्या गटनेतेपदी गणेश लोखंडे यांची निवड...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.6(डि-24 न्यूज)- विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नगरसेवक श्री. गणेश कौतिकराव लोखंडे यांची उबाठाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करून अधिकृत कागदपत्रे सादर केली. श्री. गणेश कौतिकराव लोखंडे एक अत्यंत एकनिष्ठ, जबाबदारीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. आजवर त्यांनी पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे पार पाडल्या आहेत. त्यांना शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, नगरसेवक रशीद खान मामू, सावित्रीबाई वाणी, सचिन खैरे, सुनिताताई सोनवणे, वैशाली कोरडे, हनुमान शिंदे व रामेश्वर कोरडे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow