शहरी पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी, दहा टक्के रक्कम भरण्यासाठी दिलासा...!
विविध विकासकामांची आयुक्त अमोल येडगे यांच्याकडून स्थळपाहणी...
PMAY, शाळा, कचरा प्रक्रिया प्रकल्प, महिला वसतिगृहांसह विविध कामांचा घेतला आढावा; निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शहरातील विविध विकासकामांची स्थळपाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी कामांची गती वाढवून निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
पडेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) प्रकल्पाची पाहणी करताना आयुक्तांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 30 सप्टेंबरपर्यंत दोन स्लॅबचे काम पूर्ण करावे आणि मार्चअखेरपर्यंत संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच यावेळी तीसगाव येथील PMAY प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. येथेही सप्टेंबरअखेरपर्यंत दोन स्लॅबचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पातील लाभार्थी संख्या, किती लाभार्थ्यांनी पहिला हप्ता भरला आहे तसेच प्रत्यक्ष बांधकामाची सद्यस्थिती याबाबत आयुक्तांनी माहिती घेतली. लाभार्थ्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला वेग देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मिटमिटा शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी...
मिटमिटा येथील नवीन शाळा इमारतीची पाहणी करून आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. शाळेच्या वीज गरजा लक्षात घेता सौरऊर्जा निर्मिती प्रणालीच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा शाळेला जोडण्याची शक्यता तपासावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
डी-मार्टच्या माध्यमातून शाळेसाठी कला वर्ग (Arts Classroom) व प्रयोगशाळा (Lab) उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. शक्य असल्यास 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम रोजी शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेच्या वेळेनुसार बससेवा सुरू करण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
बनेवाडी शाळेच्या बांधकामाला गती...
बनेवाडी येथील नवीन शाळा इमारतीची पाहणी करताना सहा नवीन वर्गखोल्या व स्वच्छतागृहांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. G+1 इमारतीचे अंदाजपत्रक तयार करून पुढील आठवड्यात सादर करावे, तसेच पुढील 15 दिवसांत प्लिंथ लेव्हलचे काम पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
शाळेच्या समोरील जुन्या काळातली आणि बंद पडलेली पाण्याची टाकी डेब्रिजचा वापर करून भरून जागा समतल करण्याचे निर्देश देण्यात आले. जुन्या पाण्याच्या टाकीच्या इमारतीचा पुनर्वापर करून ग्रंथालय विकसित करण्याची शक्यता तपासण्याचेही निर्देश देण्यात आले.
विटखेडा शाळेसाठी स्थळपाहणी...
विटखेडा येथील प्रस्तावित नवीन शाळेच्या जागेची स्थळपाहणी करण्यात आली. नवीन DP नुसार उपलब्ध जागा व परिसराची पाहणी करून शाळेसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
कांचनवाडीतील विविध प्रकल्पांचा आढावा...
कांचनवाडी येथील RTS केंद्राच्या शेड उभारणीच्या कामाची पाहणी करून कामाची प्रगती तपासण्यात आली. 2 ऑक्टोबरपर्यंत शेडचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
कांचनवाडी येथील MRF प्रकल्पाचे काम 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे, तसेच पेट क्रिमेटोरियमचे कामही 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कांचनवाडी येथील प्रस्तावित सहा मजली वर्किंग वुमन हॉस्टेलच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. सदर इमारतीच्या बांधकामाला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात आवश्यकतेनुसार आणखी मजले वाढविण्याबाबत विचार करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तसेच शहानुर मियां चौक परिसरात डी-मार्टजवळ प्रस्तावित पेट्रोल पंपासाठी जागेची स्थळपाहणी करण्यात आली.
चिकलठाणा C&D वेस्ट प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश...
चिकलठाणा येथील C&D Waste प्रकल्पाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रकल्प परिसरातील कचऱ्याचे ढीग तातडीने हटवून जागा मोकळी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आठ दिवसांत कचऱ्याचे ढीग हटवून जागा तयार करावी, त्यानंतर बांधकामाचे काम पूर्ण करावे आणि मशिनरीची उभारणी करावी, असे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
संपूर्ण प्रकल्पाचे काम 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
चिकलठाणा वर्किंग वुमन हॉस्टेलचा आढावा...
चिकलठाणा येथील प्रस्तावित पाच मजली वर्किंग वुमन हॉस्टेलच्या बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात सुमारे 100 महिलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून सध्या पहिल्या स्लॅबचे काम सुरू आहे. कामाची गती वाढवून जानेवारीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले.
शहरातील विविध विकासकामे नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्धारित कालमर्यादेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर महानगरपालिका प्रशासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
स्थळपाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शहर अभियंता संजय कोंबडे, अतिरिक्त शहर अभियंता अमोल कुलकर्णी, उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त अंकुश पांढरे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, उपअभियंता पूजा भोगे, स्वप्नाली माने तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पडेगाव येथील प्रकल्पास भेट दिली असता वेळोवेळी होणाऱ्या बैठका नुसार आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार एकूण प्राधान्यक्रमाची 3408 घरांपैकी 2040 घरांकरिता नागरिकांनी 10% रक्कम भरणा केलेली आहे
नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून तसेच दिनांक 30 सप्टेंबर 2026 पूर्वी योजनेची अंमलबजावणी करण्यासाथी लाभार्थी निश्चित करणे आवश्यक आहे याकरिता उर्वरित एकूण 1368 लाभार्थी लवकरात लवकर शासनाच्या पोर्टलवर आणण्याकरिता त्यांनी दहा टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे असे आयुक्तांनी सुचित केले परंतु ही सर्व घरकुले ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी असून त्यांची आर्थिक स्थिती 10 दिवसाच्या कालावधीमध्ये दहा टक्के रक्कम अंदाजे 90 हजार ते एक लक्ष पर्यंत भरण्याची नसल्यामुळे माननीय आयुक्तांनी विभागाला जागेवरच आदेश केले की १० दिवसांमध्ये संबंधित नागरिकांनी 50% रक्कम भरली तरीही आपण ती रक्कम स्वीकाराची आणि पुढील वीस दिवसांमध्ये असे ३० दिवसांमध्ये पूर्ण दहा टक्के रक्कम नागरिक भरतील अशी त्यांना खात्री आहे आणि अशा सर्व नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी माननीय पंतप्रधान यांनी चालू केलेली ही योजना पूर्ण करण्यासाठी या सर्व नागरिकांना माननीय आयुक्त श्री अमोल येडगे यांनी आवाहन केले की ज्या ज्या नागरिकांनी यापूर्वी या योजनेमध्ये अर्ज भरलेला आहे आणि ते पात्र अर्जदार आहेत तथापि पैसे अभावी त्यांनी विजेता घोषित केले असूनही रक्कम भरली नाही म्हणून त्यांना घर मिळण्यापासून ते वंचित राहिले आहेत अथवा जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत किंवा त्यांना विजेता म्हणून वेटिंग लिस्ट वर मोठ्या प्रमाणावर नागरिक उपलब्ध असल्यामुळे घोषित केले नाही अशा नॉन विनरला देखील या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ज्या नागरिकांची पुढील दहा दिवसांमध्ये 10% च्या अर्धी रक्कम भरण्याची तयारी आहे आणि ते भरू शकतात अशा नागरिकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी लवकरात लवकर विभागांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना विभागामध्ये संपर्क साधावा आणि लाभार्थी होण्यासाठी इच्छुक असल्याबाबत अर्ज द्यावा जेणेकरून अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याकरिता योजनेची पुढील कार्यवाही करता येईल या निर्णयामुळे सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि अशा नागरिकांना पुढील एक महिन्यांमध्ये आणि प्रथम दहा दिवसांमध्ये 50% पुढील एक महिन्यांमध्ये 50% रक्कम भरणा करून आपले स्वप्नातले घर पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आज पर्यंत महानगरपालिकेमध्ये उर्वरित विजेत्यांची संख्या 2421 असून प्राधान्य क्रमांक ची जी घरकुल निश्चित केलेली आहे त्यांची रिक्त संख्या केवळ 1368 आहे त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि जे प्रथम येथील त्यांना प्राधान्य क्रमाने अलॉटमेंट केले जाईल
असे आयुक्तांनी सांगितले.
What's Your Reaction?