11 सप्टेंबर पासून मराठवाड्यात "येलो अलर्ट" विजेच्या कटकडासह मुसळधार पाऊसाचा इशारा...!

 0
11 सप्टेंबर पासून मराठवाड्यात "येलो अलर्ट" विजेच्या कटकडासह मुसळधार पाऊसाचा इशारा...!

11 सप्टेंबर पासून मुसळधार पावसाचा इशारा, विजेच्या कटकडासह मराठवाड्यात येलो अलर्ट... 

मुंबई, दि.10 (डि-24 न्यूज)- मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

11 सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

12 सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.

13 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

14 सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow