अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या मागणीसाठी हमाल व कष्टक-यांनी केली निदर्शने...

 0
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या मागणीसाठी हमाल व कष्टक-यांनी केली निदर्शने...

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी - शेतमजुरांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून हमाल कष्टकऱ्यांची निदर्शने...!!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) - महाराष्ट्रातील अतिवृष्टी हीस राष्ट्रीय आपत्ती घोषित करून, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी या प्रमुख मागणीसाठी आज हमाल कष्टकऱ्यांनी निदर्शने केली.

विभागीय आयुक्तालयावर झालेल्या निदर्शनानंतर,

मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

सदरील निदर्शने जय किसान आंदोलन - स्वराज अभियान, मराठवाडा लेबर युनियन - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, राष्ट्र सेवा दल, भारत जोडो अभियान व अन्य परिवर्तनवादी संघटनांचे वतीने करण्यात आली.

निवेदनातील मागण्या या प्रमाणे..

 राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राचे ( NDRF) सध्याचे निकष ( कोरडवाहू हेक्टरी: रु.8500/.. व बागायती रु.17000/...) बदलून किमान तिप्पट करावेत..... आणि सदरील वाढ हेक्टर ऐवजी एकराला करावी.

केंद्राचे रकमे एव्हढी रक्कम राज्य सरकारने द्यावी.

शेतकऱ्यांना पिकविम्याचे वाटप त्वरित करावे.

गाव पातळीवर अद्यावत हवामान केंद्राचे गठण करावे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.

NDRF ची पथक तात्काळ पाठवून, खरीपाची नुकसान भरपाई तात्काळ दिली जावी आणि रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते इ. आवश्यक बाबींचा मोफत पुरवठा करा.

संपूर्ण राज्यात विनाविलंब ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतमजूर व ग्रामीण कष्टकऱ्यांना घर, जनावरे व रोजगाराचे नुकसानीची भरपाई करावी.

यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व जय किसान आंदोलन - स्वराज अभियानचे साथी सुभाष लोमटे , अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्रा.एच. एम. देसरडा , मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ऍड. सुभाष सावंगीकर, राष्ट्र सेवादलाचे प्रा. प्रकाश दाणे, भारत जोडो अभियानचे प्रा. गीता कोल्हटकर व साथी भाऊ पठाडे, स्वराज अभियानचे साथी शेख खुर्रम यांची भाषण झाली.

या निदर्शनात साथी छगन गवळी, साथी देविदास किर्तीशाही, साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव इ. ची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow