जेव्हा मनपा प्रशासक स्कुटरवर फिरुन एक्शनमध्ये येतात...!

 0
जेव्हा मनपा प्रशासक स्कुटरवर फिरुन एक्शनमध्ये येतात...!

जेव्हा मनपा प्रशासक स्कुटरवर फिरुन एक्शनमध्ये येतात...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांचे साधे राहणीमान आणि ते जेव्हा एक्शनमध्ये येतात स्कुटरवर फिरुन शहरात सुरू रस्त्याच्या कामाचा आढावा घेऊन रस्त्यांची कामे लवकर मार्गी लावावे यासाठी रस्त्यावर उतरले. पावसाळ्यात नागरीकांना चिखलाचा सामना करावा लागणार नाही. आरेफ काॅलनी वार्डात ऐतिहासिक झिल समोरील रस्त्याच्या कामात काही लोकांनी अडथळा आणल्याने नागरीकांना रस्त्यावर चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासक महोदय चक्क रस्त्याची पाहणी करण्यासाठी या मार्गाची पाहणी करण्यासाठी माजी नगरसेवक जमीर अहेमद कादरी यांच्या स्कुटरवर दाखल झाले. त्यांनी नागरीकांच्या तक्रारी ऐकून घेत शहर अभियंतांना आदेश दिले या रस्त्याच्या कायदेशीर बाबी तपासून कारवाई करुन तात्काळ रस्त्याचे थांबलेले काम सुरू करा. नागरीकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश दिले.

याप्रसंगी वार्डातील एम.डी.जाविद, परवेझ खान, शेख साबेर, शेख शमीम, मश्शू सिद्दीकी, डॉ.सिराज बेग, एड जहीर, शहर अभियंता देशमुख व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow