मतदार यादी विशेष पुनरिक्षणात शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यासाठी काँग्रेसची बदलाची मागणी...

 0
मतदार यादी विशेष पुनरिक्षणात शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यासाठी काँग्रेसची बदलाची मागणी...

मतदार यादी विशेष पुनरिक्षणात शिक्षकांवर कामाचा ताण; तातडीने बदलाची मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रक्रियेत मतदार यादी अद्ययावत करणे, मॅपिंग करुन अस्पष्ट फोटो अपडेट करणे तसेच डेमोग्राफिकल माहिती दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.

निवडणूक विभागाने या कामासाठी बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या केल्या असून प्रत्यक्षात शिक्षकांनाच अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेचे नियमित शैक्षणिक काम सुरू असताना या अतिरिक्त कामामुळे शिक्षकांवर ताण वाढत असून विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेकडे लक्ष देऊन शिक्षकांऐवजी आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लॅब अटेंडंट व असिस्टंट यांची नियुक्ती करून कामाचा ताण कमी करावा, जेणेकरून मतदार यादी विशेष पुनरिक्षणाची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत निवडणूक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अब्दुल्लाह शकील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow