प्रशासनात पारदर्शकता व गतीला प्राधान्य, नागरीकांना योग्य पध्दतीने सेवा पुरवा - मनपा आयुक्त अमोल येडगे

 0
प्रशासनात पारदर्शकता व गतीला प्राधान्य, नागरीकांना योग्य पध्दतीने सेवा पुरवा - मनपा आयुक्त अमोल येडगे

प्रशासनात पारदर्शकता व गतीला प्राधान्य, 

नागरिकांना योग्य पद्धतीने सेवा पुरवा, आयुक्त येडगे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- शहरातील प्रशासनिक कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे यांनी घेतला.

आज लेखा विभाग, नगररचना विभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभाग, कर संकलन, मालमत्ता विभाग, प्रधान मंत्री आवास योजना, अतिक्रमण विभागासह इतर सर्व विभागांचा सखोल आढावा आयुक्त श्री येडगे यांनी महानगरपालिका मुख्यालयात घेतला.

यावेळी सूचना करताना आयुक्त म्हणाले की प्रलंबित फाईल्सची तत्काळ पूर्तता, कामकाजातील विलंब टाळणे आणि सर्व विभागांनी निश्चित वेळेत कार्य पूर्ण करण्यावर भर द्यावा. नागरिकांना योग्य पद्धतीने सेवा पुरविण्यात यावा, असा ठळक इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.

कर वसुलीचा आढावा घेताना ते म्हणाले की आगामी काळात वसुलीत प्रगती साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करण्यात यावे. तसेच तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा वापर वाढवून वसुली अधिक सुलभ व जलद करण्यावर भर देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

याशिवाय, कमी कार्यक्षमता असलेल्या वसुली कर्मचाऱ्यांचा मूल्यांकन करून आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहर विकासाच्या दृष्टीने डी.पी. रस्ते, टीडीआर, पीपीपी प्रकल्प, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, पार्किंग व्यवस्थापन तसेच पायाभूत सुविधा विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी नगर रचना विभागाचा आढावा घेताना दिले. 

महसूल वाढीसाठी विविध पर्यायांचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन, कुत्रा चावणे व रेबीज नियंत्रण, रुग्णवाहिका सेवा तसेच सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ओपीडी सेवा डिजिटल पद्धतीने अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात आला असून संबंधित यंत्रणेला समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्वच्छता व पर्यावरणाच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सिंगल यूज प्लास्टिकवर नियंत्रण, जनजागृती (IEC) मोहिमा राबविणे तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.

 आर्थिक नियोजन, कर वसुली तसेच विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावरही विशेष भर देण्यात आला.

 शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी तसेच प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संबंधित विभागांना ठोस कृती आराखड्यानुसार काम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीत सर्व विभागांकडून सविस्तर माहिती व अहवाल सादर करून प्रलंबित कामांची स्थिती तपासण्यात आली. कर वसुलीचा आढावा घेताना निश्चित उद्दिष्टे गाठण्यासाठी अधिक परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

शहरातील पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने रस्ते, ड्रेनेज, पार्किंग व्यवस्था तसेच शहरी नियोजनाशी संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. 

बेकायदेशीर कामकाजांवर नियंत्रण ठेवून पारदर्शक व शिस्तबद्ध प्रशासन राबविण्यावर भर देण्यात आला.

तसेच, बीओटी (Build Operate Transfer) तत्त्वावर प्रकल्प राबविणे, काही कामे ‘लाईव्ह मोड’मध्ये आणणे आणि विभागनिहाय प्रगतीचे नियमित मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील तीन ते चार महिन्यांसाठी स्पष्ट नियोजन करून ठरवलेल्या वेळेत उद्दिष्टे साध्य करण्यावर आयुक्तांनी भर दिला.

महसूल वाढ, प्रभावी अंमलबजावणी आणि सर्व विभागांमधील समन्वय यावर विशेष लक्ष केंद्रित करत शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रशासनाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 दिव्यांग विभाग यांचा आढावा घेताना लवकरात लवकर दिव्यांग भवन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, दिव्यांग यांचे साठी ग्रंथालय सुरू करणे अशा आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow