जटवाडा रोडची मुरुम टाकून मलमपट्टी, काम बंद असल्यामुळे समाजसेवकांच्या पुढाकाराने खड्ड्यात टाकले मुरुम...
जटवाडा रोडची मलमपट्टी, काम बंद असल्याने ठेकेदाराला टाकावे लागले मुरुम...
छत्रपती संभाजीनगर (डि-24 न्यूज)- मागिल काही महीन्यात पासून प्रभाग क्रमांक 1 जटवाडा रोड येथील हर्सुल तलाव ते सारा वैभव पर्यंत एका बाजूचे सिमेंट काँक्रीटचे काम महापालिका निवडणुकीपूर्वीपासून बंद असल्याने वाहनधारकांना रस्ता पार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डे व वीजेच्या खांबावरील लाईट बंद असल्याने अपघात होत आहेत. काम लवकर सुरू व्हावे अशी मागणी रहीवाशांची होती. दुभाजकांचे काम अर्धवट आहे तर स्ट्रेटलाईट नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. ती बातमी डि-24 न्यूजने प्रकाशित केली. येथील समाजसेवक मोईनोद्दीन शेख, एजाज खान, शेख नाजिम यांनी ठेकेदाराला संपर्क केला. रस्त्याच्या मधोमध असलेले वीजेचे काम हटवण्यासाठी वेळ लागत आहे आणि ड्रेनिज लाईनचे काम झाले नसल्याने रस्त्याचे अर्धवट काम सुरू करण्यासाठी उशीर लागत आहे. 15 दिवसांनंतर काम सुरू होईल असा शब्द प्रशासनाने दिला तोपर्यंत आज सोमवारी खड्ड्यामध्ये ठेकेदाराने जेसीबीने मुरुम टाकले यामुळे आता वाहनधारकांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मोईनोद्दीन शेख यांनी दिली आहे.
What's Your Reaction?