अंबड तालुक्यात वीज पडून दोन तरुण ठार एक गंभीर जखमी...
अवकाळी पावसात वीज कोसळून दोन तरुण जागीच ठार... एक गंभीर जखमी
अंबड, दि.30(डि-24 न्यूज) - मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे. वादळ वा-यासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तरुण अवकाळी पावसात लिंबाच्या झाडाखाली थांबले असता लिंबाच्या झाडावर वीज कोसळून दोन तरुण ठार एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती या ठिकाणी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे.
हे तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
या घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने वय 21 वर्ष, आदित्य दगडू बेद्रे वय 20 वर्ष, दोघेही राहणार महाकाळा, तालूका अंबड, जिल्हा जालना.
What's Your Reaction?