मंजूरपुरा ते रोशनगेट आराखड्यातील रस्त्याच्या मार्कींगला सुरुवात, अतिक्रमण स्वतःहुन काढून घेण्याचे आवाहन
मंजुरपुरा ते चंपा चौक विकास आराखड्यातील रस्त्याचे रेखांकनास सुरुवात...
प्रशासकांनी केली अतिक्रमण बाधित रस्त्याची पाहणी...
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मंजुरपुरा ते चंपा चौक ते रोशन गेट या विकास आराखड्यातील 15(50 फुट) मीटर रस्त्याचे काँक्रिटी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, नगर रचना विभाग कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, किरण आडे व कंत्राटदार फारुक यांची उपस्थिती होती.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील डीपी रोडवर नवीन रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्या अनुषंगाने सध्या रोशन गेट चंपा चौक मंजूरपुरा चौक पुढे सिटी चौक व पुढे सिटी चौकच्या पुढे बुढी लाईन पासून महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा रस्ता प्रस्तावित आहे. हा रस्ता विकास आराखड्यात पंधरा मीटरचा आहे. या रस्त्यावर अनेक नागरिकांनी यापूर्वीच 2012 - 13 व 2015 - 16 मध्ये भूसंपादनचा मोबदला घेतलेला आहे. तरी देखील त्या ठिकाणी पाच पाच सहा फूट पुढे येऊन अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. काहींनी तात्पुरत्या स्वरूपाचे शटर लावून दुकाने काढली आहे तर काहींनी रस्त्यावर मोठ-मोठे ओटे बांधून त्यावर शेड बांधले आहे. या भागात बऱ्याच लोकांनी परवानगी सुध्दा घेतली नसल्याचे आढळून आले आहे. ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी आहे त्या ठिकाणी बिल्डिंग लाईन च्या माध्यमातून बिंदू ठरवून रेखांकन(मार्किंग) करण्यास आज सुरुवात झाली आहे. यामध्ये आज पहिला टप्पा मंजूरपुरा चेलीपुरा शहा बाजार चौक पर्यंत मार्किंग करण्यात आली आहे. सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याने सर्वप्रथम या भागात नागरिकांना त्यांनी स्वतःहून समोर आलेले शेड व कच्चे पक्के ओटे व शटरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे नसता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी प्रथम शंभर टक्के असलेले बांधकामे काढण्यात येणार आहे.
तसेच या कारवाई करता लागणारा खर्च हा संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल किंवा संबंधित व्यक्तीच्या मालमत्ता करात वाढ करण्यात येईल. असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त महोदय यांनी केले आहे.
उद्या शहा बाजार चौक ते चंपा चौक चंपा चौक ते रोशन गेट असे रेखांकन (मार्किंग) करण्यात येणार आहे अशी माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली
आहे.
What's Your Reaction?