उर्दु शाळेत मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा...!
उर्दु शाळेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा...!
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) बुऱ्हाणी नॅशनल शिक्षण संस्था संचलित बुऱ्हाणी नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा सिटीचौक येथे मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठणाने झाली आणि त्यानंतर नात व विद्यार्थ्यांनी मराठी दिवसानिमित्त भाषणे सादर केली. त्याचप्रमाणे वाचन स्पर्धा, लेखन स्पर्धा, बडबड गीत, कविता, सादर केल्या तसेच विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे मराठी विषय संबंधी तक्ते तयार केले व विष्णू वामन शिरवाडकर यांच्या फोटोचे फ्रेम तयार केले.
यावेळी यावेळी संस्थेचे सीईओ व शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अन्सारी अबरार अहमद हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे शाळेचे इंचार्ज डॉ. सय्यद वहाब तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे इन्चार्ज शेख जावेद तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दानिश अंबेकर यांनी केले व समारोप शेख जावेद यांनी केला.
What's Your Reaction?