रोशनगेट रस्त्याचा श्वास मोकळा होणार, 50 फुट डिपि रस्ता मोकळा करण्यासाठी लवकरच मार्किंग...!

 0
रोशनगेट रस्त्याचा श्वास मोकळा होणार, 50 फुट डिपि रस्ता मोकळा करण्यासाठी लवकरच मार्किंग...!

रोशनगेट रस्त्याचा श्वास मोकळा होणार, 50 फुट डिपि रस्ता मोकळा करण्यासाठी लवकरच मार्किंग...!

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) रोशनगेटवर नेहमी वाहतूकीची वर्दळ असते. पादचा-यांना सुध्दा हा रस्ता पार करणे अवघड आहे. हा रस्ता 50 फुट(15 मीटर) स्मार्ट सिटीतून लवकर तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने मार्किंग करुन अतिक्रमण काढले जाणार असल्याने या रस्त्याचा श्वास मोकळा होणार असून वाहतूकीचा अडथळा दूर होईल असे बोलले जात आहे.

मंजूयपूरा-चेलीपूरा-चेलीपूरा-रोशनगेट हा डीपी रोड आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण व बाधित मालमत्ता हटविले जाणार आहे. अशा सूचना मनपा प्रशासनाने नगररचना विभागास केले आहे. 

रोशनगेट मंजूरपुरा रस्त्याचे भुसंपादन 25 वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या 15 मीटर रस्त्यासाठी 1995 ते 1999 दरम्यान भुसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मालमत्ताधारकांना मोबदला दिलेला आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी मागे मार्किंग केली असता विरोध केल्याने हा रस्ता बनला नाही. आता स्मार्ट सिटीच्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला जाणार असल्याने आठ दिवसांत मार्किंग केली जाणार लगेच अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली आहे. 

विश्रांतीनगर ते झेंडा चौक रस्ता नुकताच महापालिकेच्या वतीने मोकळा करण्यात आला आहे. सिडको, जालना रोड उड्डाणपूलावर गॅस गळतीच्या घटनेनंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पर्यायी रस्ते करण्याचा निर्णय घेतला. रामनगर ते शिवाजीनगर डिपी रस्ता विश्रांतीनगर येथे अडवण्यात आला होता. अनधिकृत बांधकामांमुळे मागिल 9 वर्षांपासून कार्यवाही सुरू होती. हा रस्ता 1.4 km मोकळा करण्यात आला आहे अशा प्रकारे रोशनगेट रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. शहरातील डिपी रस्ते ज्याचा मोबदला दिलेला आहे असे रस्ते मोकळे केले जाणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow