अखेर अंतर्गत तिढा सुटला, चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर, दानवेंची तलवार म्यान...!

अखेर अंतर्गत तिढा सुटला, दानवे राजी, चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर
औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या नावाची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे की चंद्रकांत खैरे असा अंतर्गत वाद सुरू होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची समजूत काढली. पक्षाचा प्रचार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. त्यांनी तलवार म्यान करत पक्षप्रमुखांचा निर्णय मान्य असल्याचे डि-24 न्यूजला सांगितले.
महायुतीचा उमेदवार आतापर्यंत ठरला नाही. शिंदे गट की भाजपा, उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले जागा भाजपाला सुटावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्यातील नेते प्रयत्नशील आहे. ते नेते हि जागा भाजपला सोडून घेतील आम्ही अजून मैदान सोडले नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने 16 उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहे. महायुती, महाविकास आघाडी व एमआयएम अशी तिरंगी लढत होईल अशी शक्यता आहे. एखादा मजबूत उमेदवार अपक्ष मैदानात उतरल्यास राजकीय गणिते बिघडतील अशीही स्थिती औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची आहे. विनोद पाटील हे सुद्धा शिंदे गटाकडून इच्छुक आहेत. वंचितचे महाविकास आघाडी सोबत जमले नाही वंचितचा सुध्दा उमेदवार मैदानात असेल. शांतिगिरी महाराज हे आपला उमेदवार देणार आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, मावळ संजय वाघेरे पाटील, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, औरंगाबाद चंद्रकांत खैरे, उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गिते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई - इशान्य संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल किर्तीकर, परभणी संजय जाधव या उमेदवारांच्या नावे जाहीर केली आहे.
What's Your Reaction?






