आरेफ नसिम खान यांना एमआयएमची ऑफर...!

 0
आरेफ नसिम खान यांना एमआयएमची ऑफर...!

आरेफ नसिम खान यांना एमआयएमची ऑफर...!

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) मुंबईचे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजीमंत्री आरेफ नसिम खान यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना ऑफर दिली आहे की मुंबईत कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ त्यांनी उभे राहावे. काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा द्या आमच्यासोबत या. निवडून आणू. अशी खुली ऑफर जलिल यांनी दिली आहे. आरेफ नसिम खान यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती की महाराष्ट्रातून 48 जागेपैकी एकही मुस्लिम नेत्याला तिकीट काँग्रेसने दिले नाही तर मुस्लिम मते चालतात मुस्लिम नेता चालत नाही असे खरमरीत पत्र दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी स्टार प्रचारकाचा राजिनामा दिला परंतु सदस्य पदाचा दिला नाही त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देऊन एमआयएमच्या तिकीटावर लढावे ओवेसी आणि मी त्यांना पूर्ण ताकत लाऊन निवडून आणू अशी ऑफर दिली परंतु आरेफ नसिम खान यांनी ऑफर नाकारली व सांगितले माझे नेता सोनिया गांधी व राहुल गांधी आहे. आरेफ नसिम खान हे राज्यातील मोठे व काँग्रेसचे निष्ठावंतपैकी एक आहे त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली व स्टार प्रचारकाचा राजिनामा दिला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow