अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती...

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- अल्पसंख्या समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी सन 2025-26 यावर्षासाठी विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.18 जुलैपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्यास दि.1 सप्टेंबर सायं. सव्वा सहा वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट ऑफलाईन पद्धतीने समाज कल्याण आयतालय पुणे येथे सादर करावी, असे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी कळविले आहे. आधी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?






