राज्यातील स्मशानभूमी, कब्रस्तानात काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याची मागणी
राज्यातील स्मशानभूमी, कब्रस्तानात काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याची मागणी
येवला,दि.1(डि-24 न्यूज)
राज्यातील हिंदू धर्मीय वैकुंठधाम, स्मशानभूमी, अमरधाम, मुस्लिम कब्रस्तान व विविध समाजाच्या स्मशानभूमीत सर्व नोकरदार हे 24 तास काम करून सेवा बजावत आहेत. या कामगारांचे सर्वेक्षण करुन शासकीय सेवेत कायम अनुदानित तत्वावर सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, हजरत शाहनूरमिया हमवी कब्रस्तान एक्शन कमिटी, ऑल कमिटी, औरंगाबाद जिल्हा कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मराठा सेवा संघ, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी महासंघ, इंडियन मोमीन फाँडेशन यांनी निवेदनाद्वारे हि मागणी केली आहे.
निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष, आदर्श महाराष्ट्र युवा भूषण जनसेवक डॉ.शेरुभाई सादीक मोमीन, राज्यप्रमुख, सल्लागार सरपंच अंगतरावदादा गरुड, जालना जिल्हाध्यक्ष शेख हसनमिया, शेख अ. रशीद, शेख शाहेद, शेख हारुण, शेख सोहेल, हुसेन मोमीन, अब्दुल कादर शेख, हुसेन हाजी बाबा कुरेशी, ज्ञानेश्वर शिंदे, अॅड अतुल दादा लोंढे, राजेंद्र गांगुर्डे, संजय संत, सय्यद हैदर, मौलाना मुश्ताक अन्सारी, अ. रहेमान शेख, मौलाना अफजलखान, राजेश गांगुर्डे, मोतीभाऊ वाघ, अब्दुल खेरवाडीकर, परवेज शेख, पैलवान नसीर अन्सारी, हुसेन अन्सारी, मोबीन मुलतानी, राशिद शेख, इम्रान शेख, अकील शेख, सलिम मुलतानी, एकबाल अन्सारी, गफ्फार अन्सारी, नफीस अन्सारी, संजय संत, मुसा खान, समीर खान, शब्बीर पठाण, अरबाज कुरेशी, जाकीरभाई मोमीन, शाहिद कुरेशी, सय्यद समीर, इरफान शाह, अल्ताफ पठाण, अश्रफ मोमीन, सय्यद अनिस, अजहर कुरेशी, मुजाहिद अन्सारी, भुरेखा जम्मेखामिया मुलतानी, रफीक अन्सारी यांच्या स्वाक्षरी आहे.
सरकारने कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
What's Your Reaction?