औरंगाबाद जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात
कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ
औरंगाबाद,दि.1(डि-24 न्यूज)- जिल्ह्यात आज कुणबी प्रमाणपत्र वाटपास प्रारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तलाठी सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले. चौका ता. औरंगाबाद येथील रिया कांताराव पवार, विराट विजय पवार, जय विजय पवार व सौरभ साईनाथ पवार यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी पैठण व फुलंब्री यांच्या कार्यालयातही जात प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी परीक्षाविक्षाधिन उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, पैठण फुलंब्री उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ उपस्थित होते. येथे रामेश्वर कचरू कोलते रा.कवीटखेडा ता.फुलंब्री, अनिल सदाशिव कापरे रा. महाल किंहोळा ता.फुलंब्री, गणेश हरिबा तुपे रा. महाल किंहोळा ता.फुलंब्री यांचे प्रमाणपत्र देण्यात आले. सन 1951 चे खासरा पाहणी पत्रक मध्ये नमुद मराठा कुणबी जातीच्या नोंदी आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.
What's Your Reaction?