मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या ठेविदारांना पैसे परत मिळवून देण्याचे दिले आदेश - माजी खासदार इम्तियाज जलील

 0
मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या ठेविदारांना पैसे परत मिळवून देण्याचे दिले आदेश - माजी खासदार इम्तियाज जलील

मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या ठेविदारांना पैसे परत मिळवून देण्याचे दिले आदेश - माजी खासदार इम्तियाज जलील

इम्तियाज जलील यांनी लाडकी बहीण योजनेवरही यावेळी टिका केली त्यांनी सांगितले हि योजना मते घेण्यासाठी बनवली आहे...

यावेळी आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याची फाॅरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना केली...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाने चिकलठाणा विमानतळावर माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त प्रविण पवार उपस्थित होते.

भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी इम्तियाज जलील यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी उपनिबंधक व संबंधित विभागाला आदेश दिले या घोटाळ्यातील आरोपिंच्या मालमत्ता जप्त केले आहे. त्याची निलामी करुन व कर्जदारांकडून थकबाकी रक्कम वसूल करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. इम्तियाज जलील यांनी सांगितले या पण लाडक्या बहीणी आहे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नाहीत तर कष्टाचे पैसे जे आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात अडकलेले आहेत ते परत मिळावे यासाठी धडपड करत आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आम्ही त्यांना सांगितले की 36 हजार खातेदार असे आहे त्यांचे फक्त 25 हजार रुपये या पतसंस्थेत अडकलेले आहेत. त्यांना तरी पैसे वाटप करायला सुरुवात करावे. सोमवारपासून उपनिबंधक यांना त्यांनी पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. 6 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व उपनिबंधक विभागाची बैठक ठेविदारांसोबत होणार आहे. 115 कोटी थकबाकी कर्जदारांकडून वसूल करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावेळी मंत्री अतुल सावे हे सुध्दा सहकारमंत्री असताना त्यांनी काम केले. हा घोटाळा झाला त्यापासून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी एकाही मंत्र्याने प्रयत्न केले नाही म्हणून त्यांच्यावरही टिका केली

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow