पैठण येथील युवक बेपत्ता, आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन
पैठण येथील युवक बेपत्ता...
छत्रपती संभाजीनगर, दि.28(डि-24 न्यूज)-विटभट्टीवर काम करणारा युवक पैठण येथून दि.3 पासुन बेपत्ता आहे, याबाबत पैठण पोलिसांत इसम हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कृष्णा शिवाजी ढोले वय 25 रा. इंदिरानगर, पैठण हा दि.3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 7 वा. शहागड कमान येथे दीपक अल्लाड यांच्या वीटभट्टीवर व गणेश खेडकर यांच्या ट्रॅक्टरवर तुकडे व विटा भरण्याचे काम आहे असे सांगून घातून गेला. तो रात्री 8 पर्यंत आला नाही म्हणून त्याचा भाऊ दत्ता ढोले हा चौकशीसाठी गेला. त्याने नातेवाईक मित्रांकडे तपास केला असता तो मिळून आला नाही म्हणून त्याची आई फुलाबाई शिवाजी ढोले यांनी पैठण पोलिसांत हरवल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार कृष्णा शिवाजी ढोले वय 25, बांधा सडपातळ, उंची 5 फुट, अंगात पिवळा शर्ट, जिन्स पॅण्ट, पायात चप्पल,मराठी हिंदी भाषा बोलतो. अशा वर्णनाचा इसम आढळून आल्यास पोलीस निरीक्षक एम.बी. गोमारे (मोबाईल क्रमांक-9049980755, व तपासी अंमलदार पोहेकॉ गायकवाड (मोबाईल क्रमांक-8888839050 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?