जि.प.शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान, पालकमंत्री अब्दुल सत्तार रमले शालेय आठवणीत

 0
जि.प.शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान, पालकमंत्री अब्दुल सत्तार रमले शालेय आठवणीत

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन

जि.प.शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान;पालकमंत्री रमले शालेय आठवणीत

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज)- मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, हे उद्गार आहेत राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे. निमित्त होते जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, कुलसचिव डॉ भगवान साखळे, प्रशांत गावंडे, निवृत्त उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव,श्री भालेराव, प्रगतिशील शेतकरी यज्ञजीत कातबने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या मातोश्री सुभद्राबाई साबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे, निवृत्त शिक्षणाधिकारी भगवानराव तुपे, महापारेषणचे संचालक उत्तमराव झाल्टे, डॉ पळशीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोठे, भरत राजपूत, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे, कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, डॉ. काळे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील माजी मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या ध्वनिचित्रफितीद्वारे मुलाखती दाखवण्यात आल्या.

पालकमंत्री सत्तार यांनी आपल्या शालेय जीवनातील प्रसंग सांगून आठवणीत रमले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा आपल्या आठवणी सांगत जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांबाबत उपस्थितांना माहिती दिली. विकास मीना यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow