औरंगाबाद मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला दावा...!

 0
औरंगाबाद मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला दावा...!

औरंगाबाद मध्य विधानसभेच्या जागेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा दावा...!

विधानसभेच्या 15 ते 17 जागा लढवणार...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि. 28(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) राज्यात 15 ते 17 जागा लढविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत औरंगाबाद मध्य विधानसभेच्या जागेवर भाकपने दावा केला अशी माहीती औरंगाबाद भाकप जिल्हा कौन्सिलने दिली आहे. 

नाशिक येथील भाकप राज्य कौन्सिल मधील निर्णयांंची माहीती देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कौन्सिल तर्फे काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्या प्रमाणे औरंगाबाद मध्य सह इतर जागांसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे भाकप कार्यकारिणीने स्पष्ट केले. राष्ट्रीय सचिव डॉ.भालचंद्र कानगो , सचिव अॅड . सुभाष लांडे , सहसचिव डॉ . राम बाहेती , राजू देसले , स्मिता पानसरे , नामदेव चव्हाण , राजन क्षीरसागर आदी बैठकीला उपस्थित होते. ' जातीय ध्रुवीकरणाच्या वातावरणात पाणी , वीज , रेशन , वेतन , शिक्षण , आरोग्य हे जनतेचे मूलभूत प्रश्न मागे पडले आहेत. याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार श्रीमंतांना मदत व गरिबांची लूट करीत आहे. केंद्राने मांडलेला अर्थसंकल्प हा भांडवलदारधार्जिणा आहे , ' अशी टीका डॉ . कानगो यांनी केली. ' राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची यंदा दीडशेवी जयंती साजरी होत आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या समर्थनासह आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात परिषद घेण्यात येईल. कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद घेणार आहे , ' असे डॉ. कानगो यांनी स्पष्ट केले. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मतदारसंघांचा आढावा घेत उमेदवारांची यादी तयार झाली असून प्रचाराची दिशा ठरविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

आगामी आंदोलने... 

 16 ते 29 ऑगस्टदरम्यान जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येईल.

30 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा किंवा धरणे आंदोलन केले जाईल. 

या प्रसिद्धीपत्रकात काॅ राम बाहेती, अ‍ॅड अभय टाकसाळ, काॅ अश्फाक सलामी, काॅ विकास गायकवाड, कॉ. भास्कर लहाने, कॉ. जॅक्सन फर्नांडीस, कॉ. मधुकर खिल्लारे , कॉ. गणेश कसबे, कॉ. अशोक जाधव, काॅ. कैलास कांबळे, काॅ. सय्यद अनिस , काॅ. अनिता हिवराळे, कॉ.रफिक बक्श, कॉ.प्रकाश बनसोड, कॉ.जफर फजलु रहेमान यांच्यासह अनेकांच्या सह्या प्रसिद्धीपत्रकात आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow