उबाठाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमक्या, याद राखा गाढवावर धिंड काढेल - अंबादास दानवे
उबाठाच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी धमक्या, याद राखा गाढवावर धिंड काढेल - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) चे 99 उमेदवार रिंगणात आहेत. उद्या 2 जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांच्या सांगण्यावरुन काही अधिकारी उबाठाच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी धमकावत आहे यामुळे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे भडकले आहेत. त्यांनी त्या अधिका-यांना अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करुन व व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून गंभीर इशारा दिला आहे. धमकावणा-या अधिका-यांना त्यांनी गाढवावर धिंड काढण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी एक्सवर पोस्ट मध्ये लिहिले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारांना माघारीसाठी धमकावत आहे. यामध्ये काही अधिकारी उर्फ सत्ताधारी पक्षाचे गुलाम फोनाफोनी करत सुटले आहेत. लक्षात ठेवा, आमच्याकडेही खाते पुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल. वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड हि निश्चित होणार, आपले काम, नितिमत्ता विसरून काम करणाऱ्यांचा बाजार मुळासकट उठवला जाईल....
झुकेगा नहीं साला असी पोस्ट अंबादास दानवे यांनी एक्सवर आज 5.21 वाजता केली आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
What's Your Reaction?