प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसच्या मजबूत पॅनलची चर्चा, महीला वकील डॉक्टर, भाऊ बहिण मैदानात...
प्रभाग 12 मधून काँग्रेसचा मजबूत पॅनलची चर्चा, महीला वकील आणि डॉक्टर, बहीण-भाऊ मैदानात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - शहरात प्रभाग क्रमांक 12 काँग्रेसच्या पॅनलची चर्चा जोरात सुरू झाली आहे. कटकट गेट, रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी, किराडपुरा भागात चर्चा या पॅनलची आहे.
प्रभागातून चारही वार्डातील उमेदवार काँग्रेसने देवून समान प्रतिनिधित्व दिले असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उच्चशिक्षित, 24 तास जनतेच्या सेवेत, सामाजिक व राजकारणाचा आणि महापालिका प्रशासनातून काम कसे करुन घ्यायचे असे अनुभवी दोन माजी नगरसेवक या मैदानात असल्याने दोन उमेदवार भाऊ बहीणीला हि निवडणूक जड जाणार नाही अशी चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. किराडपुरा येथील काँग्रेसचे नेते व माजी नगरसेवक इब्राहीम पटेल यांना या प्रभागातून काँग्रेसने मैदानात उतरवले आहेत. नगरसेवक नसताना ते परिसरातील जनतेची कामे सदैव संपर्क कार्यालय थाटून काम करतात याचा अनुभव सर्वांना आहे. त्यांच्या रेशन दुकानातून हजारो लाभार्थी अनेक वर्षांपासून लाभ घेत आहेत. कोरोना काळातही मदत, आधार कार्ड, आरोग्य कार्ड, डोळ्यांचे ऑपरेशन, आरोग्य शिबीर व शासनाच्या योजनांचा लाभ गरीबांना मिळवून देण्यासाठी ते झटतात. असा नगरसेवक पाहीजेत अशी चर्चा प्रभागात सुरू आहे. त्यांनी डि-24 न्यूजशी बोलताना सांगितले आम्ही नेहमीच मैदानात असतो. जनतेची सेवा अविरत सुरू आहे निवडणूक आली की आम्ही काम करतो असे नाही जनतेला माहिती आहे.
संकटकाळी कोण धावून जातो. काँग्रेसने पॅराशूटने येथे उमेदवार दिले नाही तर स्थानिक उमेदवार दिल्याने योग्य व सक्रीय उमेदवार दिल्याने काँग्रेसचा मजबूत पॅनल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशफाक जमील खान हे युवा नेतृत्व उदयास आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते सक्रिय समाजकारणात व राजकारणात आहेत. विविध आरोग्य शिबीरे घेवून त्यांनी हजारो आरोग्य कार्ड प्रभागात बणवून दिले. धार्मिक व सामाजिक कार्यात तत्पर असतात. कोरोना काळ असो पोलिस ठाण्याचे, मनपाचे महत्त्वाचे काम नेहमी एक फोन केला तर मदतीला धावून जातात. नशा मुक्तीसाठी परिसरातील नागरिकांना सोबत घेवून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वी शिबिर घेतले. प्रभाग नशा मुक्त करण्याचा संकल्प केला. आधार कार्ड, आभा कार्ड कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद त्यावेळी मिळाला. त्या निस्वार्थ जनसेवेमुळे काँग्रेसने त्यांना मैदानात उतरवून नगरसेवक बनण्याची संधी दिली. त्यांचा मतदारांवर दृढ विश्वास आहे त्यांना येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान करुन महापालिकेच्या सभागृहात पाठवतील असा विश्वास डि-24 न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यांची बहीण ओबीसी आरक्षित जागेतून मैदानात आहे. एड अलफिया जमील खान वकील आहे असे उच्चशिक्षित नगरसेवक झाले तर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलेल व विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रत्यक्षात येथील नागरिकांना दिसून येईल. पॅनलमध्ये काँग्रेसने रहेमानिया काॅलनी येथील माजी नगरसेविका पिएचडी डॉ.फिरदौस फातेमा रमजानी खान यांचे सामाजिक कार्य बघून पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांचा बुलंद आवाज रस्त्यावर सामाजिक आंदोलने असतील किंवा सभागृहात सर्वांनी ऐकले असेल. महीला व युवकांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमी लढत असतात. सामाजिक व राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यात त्यांचे अनमोल योगदान आहे म्हणून मतदार त्यांनाही मतांच्या रुपाने आशिर्वाद देतील असा विश्वास त्यांनी डि-24 न्यूजशी बोलताना व्यक्त केला. आता प्रचार सुरू होणार आहे जनता कोणाला मतांचा आशिर्वाद देते ते लवकरच कळेल. मैदानात असणारे सर्व उमेदवार कशा प्रकारे मतदारांचे मन वळवण्यात यशस्वी होतील हे बघावे लागेल.
What's Your Reaction?