भाजपाच्या शहराध्यक्षांची शिंदे सेनेवर टीका, युती करायची नव्हती तर 18 कार्यकर्त्यांना तिकीटे का दिली- किशोर शितोळे
भाजपाच्या शहराध्यक्षांची शिंदे सेनेवर टीका, युती करायची नव्हती तर 18 जणांना का तिकीट दिले - किशोर शितोळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - भाजपा व शिवसेनेची युतीची चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी पर्यंत सुरू होती पण शेवटच्या दिवशी महापालिका निवडणुकीसाठी युती फिस्कटली. शिंदे सेनेला 37 जागा देण्यासाठी तयार होतो. फक्त तीन सिट वाढवून पाहिजे यासाठी युती तोडली. मग भाजपाच्या 18 कार्यकर्त्यांना का तिकीटे दिली असा सवाल भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केला आहे.
अजित पवार गट, उबाठा यांच्या कडे सुध्दा उमेदवार नव्हते. शिंदे सेना 18 व उबाठा व अजित पवार गट मिळून एकूण 40 भाजपाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. त्यांना भाजपात परत बोलावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. शिंदे सेना आमचा मित्र पक्ष असल्याने मैत्रीपूर्ण निवडणूक लढू असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे एकूण 95 उमेदवार रिंगणात आहेत ते सर्व जिंकतील असा विश्वास शितोळे यांनी व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?