उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शहरात, डाॅ.गफार कादरी करणार आपल्या समर्थकांसह जाहिर प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शहरात, डाॅ.गफार कादरी करणार आपल्या समर्थकांसह जाहिर प्रवेश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) -
उद्या 14 ऑगस्ट, गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार शहराच्या दौ-यावर येत आहे. दुपारी 3 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी 3.30 वाजता मयुरनगर येथे आगमन होईल. येथे कर्नावट कॅन्सर रुग्णालयाचे फित कापून उद्घाटन करतील. दुपारी 4.30 वाजता एव्हरेस्ट इंजिनिअरींग काॅलेज येथे डाॅ.गफार कादरी हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश करणार आहे. या भव्य प्रवेश सोहळ्यात जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख उपस्थित राहणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता श्री.गणेश महासंघ उत्सव समीतीच्या कार्यालयाचे ते उद्घाटन करतील. 7.30 वाजता औरंगपुरा येथे प्रदीप चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देतील, त्यानंतर बीड येथे मोटारीने आगमण व मुक्काम करतील.
What's Your Reaction?






