विश्रांतीनगर येथे टँकरने दुषित पाणी पुरवठा, आयुक्तांची नागरिकांनी घेतली भेट

 0
विश्रांतीनगर येथे टँकरने दुषित पाणी पुरवठा, आयुक्तांची नागरिकांनी घेतली भेट

विश्रांती नगर येथे टँकरने दूषित पाणीपुरवठा झाल्याच्या संदर्भात मनपा आयुक्तांनी शिष्टमंडळा समोर मागितली माफी.

 येत्या दोन दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा करणार- आयुक्त

जर स्वच्छ पाणी मिळाले नाही तर भाकप करणार आंदोलन.कॉ खिल्लारे

औरंगाबाद, दि.24(डि-24 न्यूज) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्याशी दूषित पाण्या संदर्भात चर्चा केली असता आयुक्तांनी येत्या दोन दिवसात स्वच्छ पाणी मिळेल असे सांगितले.

याबाबत असे की

विश्रांती नगर येथे गेल्या पंधरा ते 20 वर्षांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जातो.

आजच्या घडीला एका टँकरचे (18 ड्रम) प्रमाणे जवळपास 20 हजार रु. महापालिकेला भरत असतो.

महापालिकेच्या वतीने सिडको N-5 च्या टाकीवरून पाणी पुरवठा केला जायचा परंतु अचानकपणे MIDC तील कारखान्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतून पाणी द्यायला सुरुवात केली. हे पाणी बिलकुल पिण्याजोगे नसताना देखील आम्ही पाणी पीत आहोत.

पैसे भरून जर कारखान्याला पुरवणाऱ्या टाकीतून पाणी प्यावे लागत असेल तर मग दर 3 महिन्याला एका टँकरचे पैसे महापालिका अमच्याकडून इतके पैसे का घेत आहे हा प्रश्न आहे.

गेल्या 4 दिवसांपूर्वी टँकरने आलेल्या पाण्यात अळ्या किडे वैश वास पिवळे असे पाणी पुरवठा केला आहे.

आमचं म्हणणं आहे की हे पाणी महापालिका प्रशासनाने पिऊन दाखवावे.

आजच्या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ मधुकर खिल्लारे, अनिता साबळे, बाळू बोधक, कॉ रवी बोरकर, संगीता कांबळे, संगीता मोरे, प्रियांका दांडगे, माधुरी दांडगे, अलका पवार, शिलाबाई हिवराळे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow