पवित्र रमजान महीन्याच्या आगमनाची तयारी, कटकट गेट येथे हैदराबादी हरीस...!

उद्यापासून पवित्र रमजान महीन्याच्या आगमनाची तयारी, कटकट गेट येथे हैदराबादी हरीस...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) पवित्र रमजान महीना उद्या शनिवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर सुरू होणार आहे. या महीन्यात महीनाभर मुस्लिम समुदाय रोजे ठेवतात. या पवित्र महीन्याची तयारी आधीपासून करावी लागते. शहरात विविध नवीन खवय्यांसाठी लजीज डिशेस बनवले जातात. हैदराबाद, मुंबई व विविध शहरांतील खास डिशेस येथे रोजेदारांसाठी बनवले जातात. कटकट गेट येथील खालेद टाॅवर समोर हैदराबादी लजीज हरिस हाऊसचे उद्घाटन मस्जिद उस्मानियाचे इमाम हाफिज जाहेद यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक अब्दुल अजीम व परिसरातील नागरिकांनी हैदराबादी हरिसचा स्वाद घेतला. मुज्तबा आदम, शेख सैफ, अफ्फान संग्राम, फरदीन सिद्दीकी यांनी हरिस हाऊसची सुरुवात केल्याने सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हैदराबाद येथील स्वयंपाकी यांनी सांगितले हैदराबाद येथे वापरण्यात येणारे सर्व मसाले या हरिसमध्ये बनवले आहे. पवित्र रमजान महीन्यात एकदा तरी खवय्यांनी हरिस हाऊसला भेट द्यावी असे आवाहन मुज्तबा आदम यांनी केले आहे
.
What's Your Reaction?






