विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांना मुख्यमंत्र्यांनी केले सन्मानित...!

विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांना मुख्यमंत्र्यांनी केले सन्मानित...!
मुंबई, दि.28(डि-24 न्यूज)
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या संकल्पनेनुसार प्रादेशिक स्तरावरील 100 दिवस कार्यक्रमांतर्गत नियोजन सादरीकरण संदर्भात दिलेल्या निकषांमध्ये व उप निकषांमध्ये क्षेत्रीय कार्यालयातील सुधारणा व त्याचे मूल्यमापन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक , छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) परिक्षेत्र यांचा मुख्यमंत्री यांनी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
क्षेत्रीय कार्यालयाची सुधारणा कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्याचे अनुषंगाने खालील निकष व उपनिकष निर्धारित करण्यात आले होते.
यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ....
ज्यामध्ये संकेतस्थळ वापरण्याची सुलभता, माहितीचे अद्यावतीकरण, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत माहितीचे स्वयंप्रकटीकरण,
सुरक्षितता,
लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा अधिसूचित करून ऑनलाईन प्रसिद्ध करणे.
सुकर जीवनमान
नागरी सेवांचे सुलभीकरण
स्वच्छता यामध्ये
अभिलेख निंदनीकरण व वर्गीकरण,
मुदत बाह्य अभिलेख नष्ट करणे. जड वस्तू संग्रह नोंदवही अद्यावतीकरण,
जुन्या व निरोपयोगी जड वस्तूची विल्हेवाट.
जुन्या वाहनाचे निर्लेखन.
तक्रार निवारण...
आपले सरकार पोर्टल वरील तक्रारीची निवारण
पीजी पोर्टल वरील तक्रारीचे निराकरण.
अभ्यागत भेटीचे नियोजन व भेटीच्या वेळा बाबत प्रसिद्धी लोकशाही दिनाचे आयोजन व त्यामधील तक्रारीचे निराकरण.
कार्यालयीन सोयी सुविधा
कायमस्वरूपी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
कर्मचारी व अभ्यागत यांच्यासाठी स्वच्छ प्रसाधनगृहाची व्यवस्था,
अभ्यंगतासाठी सुसज्ज प्रतीक्षालय व्यवस्था ,
कार्यालयामध्ये सुव्यवस्थित नाम फलक व दिशादर्शक फलक लावणे.
कार्यालयाचे सौंदर्यीकरण.
क्षेत्रीय कार्यालयांना भेटी..
आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करणे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रम/ प्रकल्पांना भेटी देऊन अंमलबजावणी व पर्यवेक्षण करणे.
क्षेत्रीय भेटीदरम्यान ग्रामपंचायत,शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र,
यांना भेटी देऊन कामकाजावर देखरेख ठेवणे. ग्राम स्तरावरील कर्मचाऱ्यांचे अनुभव अडचणी व सूचना यावर त्वरित कार्यवाही करणे.
ई ऑफिस प्रणाली..
प्रशासकीय कामकाजात 1 जानेवारी 2025 पासून ई ऑफिस प्रणालीचा वापर करणे.
ई ऑफिस प्रणालीत चार किंवा त्यापेक्षा कमी स्तरावर मान्यता घेऊन प्रकरणाचा निपटारा करणे.
आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन..
गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.
व्यापारी /कामगार वर्गाच्या संघटनाशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडविणे. गुंतवणूकदार उद्योजकांच्या अडचणीचे निराकरण करणे.
गुंतवणूकदार/ उद्योजकांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे हाताळणे.
अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर..
नव्याने सेवेत प्रविष्ट अधिकारी /कर्मचारी यांना प्रशिक्षित करणे.
पदोन्नत्या व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे.
कृत्रिम बुद्धिमत्ता /तंत्रज्ञान वापरण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
कार्यालयातील कामकाज अचूक होण्यासाठी प्रत्यक्ष कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणे.
नावीन्यपूर्ण उपक्रम..राबवल्याने त्यांना गौरविण्यात आले. पोलिस विभागात विरेंद्र मिश्र यांचे अभिनंदन केले जात आहे.
What's Your Reaction?






