आमदार संजय गायकवाड व इम्तियाज जलिल वाद टोकाला, स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार...

 0
आमदार संजय गायकवाड व इम्तियाज जलिल वाद टोकाला, स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार...

संजय गायकवाड व इम्तियाज जलिल यांचा वाद टोकाला...हि कोणती लढाई...

"स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार...! – संजय गायकवाडांचा इम्तियाज जलील यांना थेट खुला आव्हान दिल्याने राजकारण तापले...

       

बुलढाणा दि.23(डि-24 न्यूज) - शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे कॅन्टीन प्रकरणानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधक त्यांच्यावर टिका करत आहे तर ते प्रत्युत्तर देत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्याशी होणाऱ्या लढाईसंदर्भात थेट पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला आहे. या करारात त्यांनी स्पष्ट केले आहे की, जलील आणि त्यांच्या दरम्यान लढाई होणार असून त्यामध्ये कोणतेही शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे किंवा कोणत्याही प्रकारचे हिंसक साहित्य वापरले जाणार नाहीत.

या लढाईत कोणताही तिसरा व्यक्ती सहभागी होणार नाही, याची जबाबदारी पोलीस यंत्रणांनी घ्यावी, असे गायकवाड म्हणाले. लढाईची तारीख आणि वेळ ठरवण्याचे अधिकार इम्तियाज जलील यांच्याकडे देण्यात आले आहे. दोघांच्याही कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान झाल्यास जबाबदारी एकमेकांचीच असेल, असेही करारात नमूद आहे.

संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणात पक्ष, धर्म, मित्रमंडळी, नातेवाईक वा कार्यकर्त्यांना सामील केले जाणार नाही. दरम्यान, मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये झालेल्या कथित वादानंतर जलील यांनी गायकवाड यांना मारण्याचे आव्हान दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बुलढाण्यातील सभेत जलील यांनी ही धमकी दिल्याचा दावा गायकवाड यांनी केला.

या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, यावर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, "लोकप्रतिनिधींनी स्वतःचे भान ठेवावे, असे राजकारण महाराष्ट्राने याआधी पाहिले नव्हते," अशी टीका केली जात आहे.

शेवटी एकच सवाल – जनतेच्या कामांसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी, आता व्यक्तिगत लढाया करारावर उतरवणार का...? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow