...तर राज्यात पुन्हा विधानसभा निवडणूका - आमदार रोहीत पवार

...तर राज्यात पुन्हा विधानसभा निवडणूका - आमदार रोहीत पवार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातलगांना व आमदारांना इन्कम टॅक्सची नोटीस...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) -
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणुका मॅनेज करु शकता येतात याचा पुरावाच दिला. एका व्यक्तीचे तीन राज्यात मतदार यादीत नावे आढळली. ईव्हीएम मैनेप्युलेशन कसे केले जाते. मतांची कशी चोरी केली जाते. निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उदाहरण सुध्दा त्यांनी दिले याबद्दल आम्ही सहमत आहोत. याचे उत्तर सरकारने द्यावे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल व घड्याळ चिन्ह आम्हाला बहाल होईल. उध्दव ठाकरे यांना त्यांचा धनुष्यबाण चिन्ह परत मिळण्याची कुणकुण सुरु झाल्याने महायुतीत बेचैनी वाढत आहे. आमच्या बाजूने हा निकाल लागला तर शिंदे सेनेचे 55 आणि अजित पवार गटाचे 40 आमदारांना भाजपात विलिन व्हावे लागेल नाही तर या 95 विधानसभा जागेवर पुन्हा निवडणुका घ्यावे लागतील. हाच पर्याय आहे. या सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एका बाईक टॅक्सी कंपनीकडून गोविंदासाठी स्पाॅन्ससरशिप घेत आहे हे कितपत योग्य आहे. कोट्यावधी रुपये घेवून स्पाॅन्सरशिप घेतली हा भ्रष्टाचार नाही का...? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हे बघावे. भुमरेंना लायसन्स लगेच मिळाते हे समोर आले यानंतर भुमरे यांच्या चालकाला शेकडो कोटींची मालमत्ता मिळते कदाचित ती मालमत्ता भविष्यात भुमरेकडे जाईल अशी परिस्थिती आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे अनेक प्रकरणे उघडकीस आले. कार्यवाही काही होताना दिसत नाही. हाॅटेल विटस खरेदी प्रकरण, एमआयडीसीचा प्लाॅट मुलाच्या नावावर, त्या कंपनीत दारु बनवली जाईल असे कळाले. सरकारी जमीनी घेतल्याचे आरोप आहे. महाराष्ट्र कोठे घेऊन जात आहे. काही लोकप्रतिनिधींना इन्कम टॅक्सच्या नोटीसा मिळत आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. युवा, महीलांचे प्रश्न आहेत. बेरोजगारी वाढत आहे. अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरुन अक्रामक आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत आमदार रोहीत पवार यांनी दिला आहे.
What's Your Reaction?






