शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सर्वेक्षण कशासाठी - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

 0
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सर्वेक्षण कशासाठी - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सर्वेक्षण कशासाठी - प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे

आंबेडकारांना दिले उत्तर, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत यावे, कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) -

महायुती सरकारने निवडणुकीत शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आज राज्यातील शेतक-यांमध्ये असंतोष आणि नाराजगी आहे. महसूलमंत्री म्हणत आहे कमेटी बनवली ते सर्वेक्षण घेऊन ठरवतील कोणाला कर्जमाफी द्यायची आहे. शरद पवारांनी थेट कर्जमाफीचा निर्णय घेतला होता त्यांनी कोणताही सर्वे केला नव्हता सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहिर केला होता. परंतु महायुती सरकारने निवडणुक जिंकण्यासाठी लाडल बहिण योजना आणली व जाहीरनाम्यात कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करावे नसता राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पुर्वतयारी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना स्थानिक पातळीचे प्रश्न उपस्थित करुन आंदोलन करावे. नवे व जुने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबुत करणार आहे. जाणा-यांचा आम्ही विचार करणार नाही जे कठीण काळात सोबत आहे त्यांचाच भविष्यात विचार करु. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सोबत लढू. तीनही पक्षांची संयुक्त बैठक घेवू. उध्दव ठाकरे व राज ठाकरे एका कारणासाठी एकत्र आले होते त्यांनी अजून युती केली नाही. युती झाल्यानंतर बघू वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेवून त्यावेळी चर्चा करु. निवडणुक चिन्ह आम्हाला पुन्हा मिळेल अशी अपेक्षा आणि चर्चा आहे म्हणून काही नेते पक्षांतर करत आहे त्याचे उदाहरण जालन्याचे काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल भाजपात गेले. कुणकुण लागल्यामुळे राज्यात पक्षांतर सुरु आहे परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल. म्हणून महायुतीत काही अलबेल दिसत नाही. आमदारांची बेचैनी वाढत चालली आहे. असे शिंदे पुढे म्हणाले.

शरद पवार हे भाजपाचे हस्तक आहे काही दिवसांत मोठी बातमी येईल असे वक्तव्य वंचितचे सर्वेसर्वा एड प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले होते त्यांना शिंदेंनी प्रत्युत्तर देताना सांगितले गेल्या विधानसभेत त्यांनी महाविकास आघाडीत यावे यासाठी सकारात्मक प्रयत्न केला गेला परंतु त्यांनी अवास्तव अपेक्षा केल्याने शक्य झाले नाही. त्यांनी स्वबळावर निवडणूका लढवल्या त्याचा फायदा मतविभाजन होऊन भाजपाला फायदा झाला. निवडणुका आल्या की चर्चेला वाव देण्यासाठी असले वक्तव्य केले जाते. आम्हालाही अनेक शंका आंबेडकरांबाबत आहे आम्ही काही बोललो नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी आमदार रोहीत पवार, माजीमंत्री राजेश टोपे, चंद्रकांत दानवे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, मुश्ताक अहेमद, नवीन ओबेराॅय, महीला शहराध्यक्ष मेराज पटेल, सय्यद तौफीक, मुन्नाभाई, शेख इरफान, मोहंमद ताहेर यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow