महात्मा फुले महामंडळ बीज भांडवल कर्ज योजनेसाठी मागवले अर्ज

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची
बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)- महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या वतीने अनुदान, वीज भांडवल व थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत जिल्ह्याला 90 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर थेट कर्ज योजनेसाठी (1 लाख रुपये मर्यादा) 32 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज सप्टेंबर 2025 अखेर महामंडळाच्या http://mahadisha.mpbcdv.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
What's Your Reaction?






