मनपातर्फे तीन नागरिकाभिमुख डिजिटल सेवांचा शुभारंभ...

मनपा प्रशासनतर्फे तीन नागरिकाभिमुख डिजिटल सेवांचे शुभारंभ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 23(डि-24 न्यूज) महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 22 जुलै रोजी तीन आधुनिक, नागरिकाभिमुख डिजिटल सेवांचा औपचारिक शुभारंभ करण्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले.
या सेवांमध्ये:
स्मार्ट छ. संभाजीनगर व्हॉट्सअॅप चॅटबॉट...
भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)...
सक्षम मोबाईल अॅप्लिकेशन
यांचा समावेश आहे. या तीनही सेवा नागरिकांना अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि तंत्रस्नेही नागरी प्रशासनाचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट छ. संभाजीनगर व्हॉट्सअॅप चॅटबॉट
ही सेवा +91 9485202020 या क्रमांकावर सुरू करण्यात आली असून, नागरिकांना कोणताही अॅप डाऊनलोड न करता थेट व्हॉट्सअॅपवरून:
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरणे, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र डाऊनलोड करणे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अपडेट करणे, RCS अजमावणे, बंद लाईट, कचरा गाडीची वेळ, अवैध होर्डिंग्स यांसारख्या तक्रारी नोंदवणे सहज करता येईल. ही सेवा मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. पेमेंट गेटवे एकत्रित केल्यामुळे नागरिकांना सुविधा केंद्रात प्रत्यक्ष येण्याची गरज नाही.
भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS)
ही राष्ट्रीय पातळीवरील NPCI समर्थित आणि RBI नियंत्रित सेवा असून, नागरिक आता कोणत्याही: UPI अॅप वॉलेट, नेट बँकिंग प्लॅटफॉर्म द्वारे महापालिकेचे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी सहजपणे भरू शकतात. फक्त मालमत्ता क्रमांक किंवा पाणीपट्टी क्रमांक टाकून थकबाकी तपासावी आणि तत्काळ पेमेंट करता येते.
ही सेवा Google Pay, PhonePe, Paytm, BHIM, Amazon Pay, Cred यांसारख्या सर्व अॅप्सवर उपलब्ध आहे.
“सक्षम” मोबाईल अॅप
हे अॅप विशेषतः दिव्यांग नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आले असून, त्यांना शिष्यवृत्ती, उपजीविकेचे सहाय्य, आर्थिक सवलत भत्ते यांसाठी नोंदणी व खात्रीप्रक्रिया पार पाडता येते.
UDID कार्ड प्रमाणीकरण, लाईव्ह सेल्फी सबमिशन (जीवन प्रमाणपत्रासाठी) सहज करता येते.
सदरील अँप OTP आधारित प्रवेश प्रणाली वर विकसित करण्यात आला आहे.
या गोष्टींमुळे अॅप सुरक्षित, पारदर्शक आणि गैरवापर प्रतिबंधक आहे. अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
या तिन्ही सेवांचा शुभारंभ म्हणजे प्रशासनाच्या पारदर्शक, सहभागी आणि नागरिक-केंद्रित दृष्टिकोनाचा ठोस पुरावा आहे. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन नागरिक सक्षमीकरण, सुविधा विस्तार आणि कार्यक्षम सेवा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहेत.
What's Your Reaction?






