महापौर पण समीर आणि विरोधीपक्षनेते पण समीर लाभले शहराला, अब्दुल समीर यांनी आज पदभार स्वीकारला...

 0
महापौर पण समीर आणि विरोधीपक्षनेते पण समीर लाभले शहराला, अब्दुल समीर यांनी आज पदभार स्वीकारला...

महापौर पण समीर आणि विरोधीपक्षनेते पण समीर लाभले शहराला, आज अब्दुल समीर यांनी पदभार स्वीकारला...

सभागृहात लोकांचे प्रश्न मांडण्याचा महापौरांचा सल्ला...

महापौरांनी दिले विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद बिल्डर यांना दिले नियुक्तीपत्र...वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा केला अब्दुल समीर यांचा संकल्प...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर साजिद बिल्डर यांना सोमवारी महापौर समीर राजूरकर यांनी नियुक्तीपत्र दिले. सभागृहात लोकांचे प्रश्न मांडा, वैयक्तिक प्रश्न नको, गोंधळ नको, असा सल्ला यावेळी महापौरांनी विरोधी पक्षनेत्यांना दिला. या महापालिकेत महापौर म्हणून समीर आणि विरोधीपक्षनेते म्हणून समीर हे पहिल्यांदाच महापालिकेच्या इतिहासात बघायला मिळेल. 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत त्यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले वडील दिवंगत साजिद बिल्डर यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते व स्थायी समिती सभापती म्हणून शहराच्या विकासासाठी योगदान दिले आहे त्यांचे शहराच्या विकासासाठी स्वप्न पूर्ण करण्याची संधी इम्तियाज जलील यांच्यामुळे शक्य झाली त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. जन्म प्रमाणपत्रासाठी नागरीकांना झोन कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात त्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावे. बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपावरून त्यांनी समाचार घेतला. शहरात लवकर हाॅकर्स झोन तयार करण्यासाठी आवाज उठवणार. अतिक्रमण म्हणून डिपी रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिका प्रशासन कारवाई सुरू करणार आहे यासाठी विरोध करणार नाही परंतु रस्ता लगेच बनणार का...त्याचे टेंडर प्रक्रिया झाली का हे अगोदर बघणार. ज्यांची मालमत्ता रस्त्यांसाठी बाधित होत असेल तर त्यांना मोबदला नियमानुसार मिळाले का हे पण बघणार आहे. सत्ताधारी जनतेला मुलभूत सुविधा देण्यासाठी कमी पडत असेल तर एमआयएमचे नगरसेवक सभागृहात आवाज उठवणार असा इशारा त्यांनी यावेळी अब्दुल समीर यांनी दिला. 

महानगरपालिकेत 33 जागा जिंकून एमआयएम विरोधी पक्ष ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विरोधी नेतेपदी अब्दुल समीर यांची निवड केली. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी एमआयएमच्या गटनेत्यांसह 32 नगरसेवकांनी महापौरांना रितसर पत्र दिले होते. त्यानंतर महापौरांनी सोमवारी त्यांना नियुक्तीपत्र दिले. तुम्ही आता 5 वर्षे नगरसेवक आहात, आपली कामाची स्पीड कमी ठेवा. विकासाला साथ द्या, असे आवाहनही यावेळी महापौरांनी एमआयएमच्या नगरसेवकांना केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow