प्रभाग क्रमांक 1 मध्ये अंगणवाडी सुरू करण्याची नगरसेवकाची मागणी...
प्रभाग क्रमांक 1 मध्ये अंगणवाडी सुरू करण्याची नगरसेवकाची मागणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - प्रभाग क्र.1 हर्सुल अंतर्गत फातेमानगर, यासीननगर, कैसर पार्क, एकबालनगर, जहांगीर कॉलनी, सईदा कॉलनी, बशीरनगर, अंबरहिल, भगतसिंगनगर, संभाजी कॉलनी याठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यासाठी नगरसेवक अजहर पठाण यांची एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंगळे यांच्याकडे मागणी.
या भागांमध्ये लहान बालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सदर परिसरात अंगणवाडी केंद्राची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्वप्राथमिक शिक्षण यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा लाभ सर्व पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील नमूद ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक अजहर पठाण यांनी केली.
What's Your Reaction?