गुंठेवारी करण्यासाठी 6 महीन्याची मुदतवाढ देण्याची मागणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

 0
गुंठेवारी करण्यासाठी 6 महीन्याची मुदतवाढ देण्याची मागणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

मनपाच्या गुंठेवारीसाठी जनहितार्थ किमान सहा महीने मुदतवाढ द्या -राजेंद्र दाते पाटील

 खुले प्लॉट आणि बांधकाम अधिकृत करा!

नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांना निर्देश जारी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- महानगर पालिका छत्रपती संभाजीनगर गुंठेवारी योजनेत खुले प्लॉट व बांधकाम अधिकृत करण्यासाठी दुष्काळ सदृश स्थिती पाहता सहा महिने जुन्या निर्णया प्रमाणे मुदत वाढ देण्याचे आदेश तात्काळ करा अशी मागणी जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी एकनाथराव शिंदे उप मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे जनहितार्थ केली होती.

मागणीचे गांभीर्य लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी नगर विकास विभागा दोनचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांना तातडीने निर्देश जारी केले असुन तसा मेल डॉ. राजेंद्र दाते पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवला आहे.

या निवेदनात असे नमुद केले आहे की, महापालीका छत्रपती संभाजीनगर येथे गुंठेवारी योजने अंतर्गत घरे व खुले प्लॉट सवलतीच्या योजनेत नियमानुकूल करून घेण्याची मोहीम सुस्थितीत सुरु आहे. दुष्काळ सदृश स्थितीमुळे नागरिक हतबल झालेले असल्यामुळे सप्टेंबर महिन्या पर्यंत मुदत दिली होती ही मुदत वाढ किमान सहा महिने होणे अत्यावश्यक आहे. अचानकपणे मनपा आयुक्त यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच प्लॉट, घराच्या गुंठेवारीसाठी अखेरची मुदत देण्याचा निर्णय केला असुन हा अंत्यन्त अन्याय कारक ठरणार असुन यात भरीसभर म्हणुन 1 नोव्हेंबर 2026 पासून अनधिकृत घरे पाडण्याची मोहीम सुरू करण्याची घोषणा ही तर गोरगरीब जनतेने प्रचंड मेहनतीने प्राप्त केलेली सदरची मालमत्ता पडण्याचा निर्णय निवारा या संकल्पने वर घाला घालण्याचा अन्याय कारक निर्णय आहे. पुढे जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील म्हणतात की, गुंठेवारी योजनेत खुले प्लॉट अधिकृत करण्यासाठी महापालिकेने 15 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली होती. ही मुदत वाढविण्याचा निर्णय आयुक्त अमोल येडगे यांनी गुरुवारी घेतला तो फक्त 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच असुन नागरिकांना खुले प्लॉट आणि घरांची गुंठेवारी चार्जेसमध्ये 50 टक्के सूट देण्यात आली आहे. घरांसाठी बेटरमेंट चार्ज 100 टक्के ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून माफ करणार असुन सोबतच अन्सलरी आणि साइड मार्जिन वरील प्रत्येकी दहा टक्के लावण्यात येणारा दंडही माफ केलाआहे. गुंठेवारीत पूर्वी आकारण्यात येणारा 60 टक्के दंड आता माफ झाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत असुन 1 एप्रिल ते 15 सप्टेंबर पर्यंत गुंठेवारी योजनेतून 57 कोटी 29 लाख रुपये मनपास प्राप्त झाले असुन आता गुंठेवारी योजनाच पूर्ण पणे बंद करण्याचा आयुक्ताचा मानस जनविरोधी असुन अगदी शेवटच्या दिवशी 12 ते 15 कोटी रुपये नागरिकांच्या वतीने भरले जातील अशी अपेक्षा असुन ही बाब मनपाच्या उत्पन्नास भर घालणारे असुन सहा महिने मुदत वाढ म्हणजे मनपाच्या उत्पन्ननात भर घालणारा शासनाचा सकारात्मक निर्णय ठरेल असेही जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी केले. यामुळे त्यांनी नगरविकास मंत्र्यांना विनंती केली आहे की, महानगर पालिका छत्रपती संभाजीनगर गुंठेवारी योजनेत खुले प्लॉट व बांधकाम अधिकृत करण्यासाठी दुष्काळ सदृश स्थिती पाहता सहा महिने जुन्या दर व निर्णया प्रमाणे मुदत वाढ देण्याचे आदेश तात्काळ जनहितार्थ व्हावेत ही नम्र विनंती त्यांनी केली 

नगर विकास विभागा दोनचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांना तातडीने निर्देश एकनाथराव शिंदे यांनी जारी केले असल्याची माहिती जन आंदोलन विकास कृती समिती महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow