बारुदगर नाला येथील 39 अनाधिकृत नळ तोडले...! गुन्हे दाखल होणार

 0
बारुदगर नाला येथील 39 अनाधिकृत नळ तोडले...! गुन्हे दाखल होणार

बारुदगर नाला येथील 39 अनाधिकृत नळ तोडले

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकाचे प्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्या अधिपत्त्याखाली मोहल्ला झाडू वाली गल्ली,

बारुदगर नाला येथे महानगरपालिकेच्या 150 मिमी जलवाहिनी वरील एकूण 39 अनधिकृत नळ खंडित करण्यात आले. 

सदरील ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या मुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ही कारवाही तातडीने पोलिस बंदोबस्त घेऊन पार पाडण्यात आली.

अनाधिकृत नळ जोडण्या देणाऱ्या विना परवाना धारक प्लंबर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे 

पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले.

सदरील अनधिकृत नळ खंडित करण्याचे काम चालू असतांना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनातर्फे पो. उप निरीक्षक पंडित वाघ व सोबत इतर कर्मचारी होते.

पथकाला प्राप्त होणाऱ्या अशा तक्रारींमुळे या सारख्या कार्यवाही चालू राहतील.

सदरील कार्यवाही ही उप अभियंता मिलिंद भामरे, 

 पथक अभियंता रोहीत इंगळे, कनिष्ठ अभियंता सुमित बोराडे,

पथक कर्मचारी वैभव भटकर, स्वप्निल पाईकडे, तमिज पठाण, मो. शरीफ, सागर डिघोळे, तुषार पोटपिल्लेवार आदींनी पूर्ण केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow