दिल्लीत सावित्रीचा डंका..! स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या उपक्रमांचे आकर्षण
दिल्ली येथे "सावित्री" चा डंका!!
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) दिनांक 17 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील शंभर स्मार्ट सिटी अंतर्गत राबविलेल्या उपक्रमाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.
या प्रदर्शना मध्ये शहर स्मार्ट सिटी ने सहभाग घेतला असून यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.
यामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्मार्ट स्कूल आणि "सावित्री" एज्युकेशन कंट्रोल रूम, झुलॉजिकल पार्क, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्मार्ट बस डेपो,शिवसृष्टी, कमांड अँड कंट्रोल सेंटर , उडाण - डिजिटल ऍड्रेस नंबर, लाईटहाऊस, इ गव्हर्नन्स प्रकल्प, हेरिटेज गेट , खाम नदीचे पुनर्जीवन, जी आय एस प्रकल्प, आयस्कोप या बाबत माहिती चे स्टॉल्स स्मार्ट सिटी तर्फे लावण्यात आले आहेत.
या मध्ये "सावित्री" एज्युकेशन कंट्रोल रूम व इतर सर्व उपक्रमच्या स्टॉल्सला देश विदेशातून भेट देणारे सर्वजण या कामाचे कौतुक करत आहेत.
ह्या सर्व प्रोजेक्ट साठी मनपा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी अरुण शिंदे ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांच्या सहकार्याने स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, फैज अली, स्नेहा बक्षी, प्रतिक मानवतकर तसेच शिक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, ग्राउंड अप चे प्रतिनिधी सत्यम आव्हाड व इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स बद्द्ल देश विदेशातून भेट देणाऱ्या सर्वांना शहराच्या गौरवशाली इतिहास बाबत सांगत आहेत.
What's Your Reaction?