अंबादास दानवे यांच्या विरुद्ध अब्रु नुकसानिचा दावा ठोकणार खासदार संदीपान भुमरे... कथित जमीन व्यवहार प्रकरण

 0
अंबादास दानवे यांच्या विरुद्ध अब्रु नुकसानिचा दावा ठोकणार खासदार संदीपान भुमरे... कथित जमीन व्यवहार प्रकरण

अंबादास दानवे यांच्या विरुद्ध अब्रु नुकसानिचा दावा ठोकणार खासदार संदीपान भुमरे, जावेद रसूल शेख जमीन व्यवहाराला पुन्हा राजकीय वळण...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - जावेद रसूल शेख जमीन व्यवहार प्रकरणी आणखी राजकीय वळण लागले आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी आरोप केल्यानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत दानवेंच्या विरुद्ध अब्रु नुकसानिचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भुमरे यांच्यावर दानवे यांनी केलेल्या 1150 कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपांना भुमरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्या गट नंबरचा उल्लेख दानवेंनी केला तो गटच अस्तित्वात नाही असे स्पष्ट करत दानवेंच्या विरुद्ध अब्रु नुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले दानवेंनी ज्या जमीनीचा उल्लेख केला तिथे केवळ 171 गट नंबर आहे. तिथे हिबानामा(भेट पत्र) होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 154 गट नंबरचाही उल्लेख त्यांनी केला तो न्यायालयात असून संबंधित व्यक्ती पूर्णपणे वेगळे आहेत. आपल्या चालकाच्या नावावर जमीन असल्याच्या आरोपावर भुमरे म्हणाले माझ्या चालकाने कधीही जमीन घेतली नाही. ज्या प्रकरणाचा उल्लेख दानवे करत आहे तेव्हा चालकाचा जन्मही झालेला नाही. अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले असून पूर्वीचे सर्वे नंबर आता बदललेले आहेत. दानवे यांच्याकडे काही काम नाही एमएलसी सुध्दा नाही केवळ प्रसिद्धीसाठी व संदीपान भुमरे दिसले की आरोप करण्यासाठी ते हे उद्योग करत आहे.

समृध्दी महामार्गातील 1150 कोटी रुपयांच्या मुल्यांकनातील रक्कम मिळावी यासाठी खासदार संदीपान भुमरे यांचे वाहनचालक जावेद रसूल शेख यांच्या नावे 1971 मध्ये 3 एकरचा हिबानामा(बक्षीस पत्र) करण्यात आला. जावेद रसूल यांचा जन्म 1985 मधील असल्याने हा बक्षिसपत्र कसा झाला यात कोणाचे हितसंबंध आहेत याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूल प्रशासनाकडे केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow