लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण - आमदार सौ.मेघना बोर्डीकर

 0
लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण - आमदार सौ.मेघना बोर्डीकर

लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठीच बदलापूर घटनेचे राजकारण-भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांचा घणाघाती आरोप... अशांतता निर्माण करण्याच्या महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.23(डि-24 न्यूज)

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून घाबरलेल्या उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाने बदलापूर घटनेचे राजकारण सुरू केले आहे. या घटनेवरून राज्यात हिंसाचार माजवून अशांतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले जात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. महाराष्ट्राचा मणिपूर होतोय असे भाकीत शरद पवार यांनी वर्तविल्यानंतर राज्यात अशांतता, सामाजिक अस्वस्थता पसरत आहे, हा योगायोग आहे की नियोजित डाव, असा प्रश्नही आमदार सौ. मेघना बोडर्डीकर यांनी केला.

भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

बंद पुकारुन हिंसाचार माजविण्याच्या महाविकास आघाडीच्या या हिन राजकारणाला बळी न पडता राज्यात शांतता राखावी, असे आवाहनही आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी केले.

आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाने साधा निषेधही केला नाही. बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. बदलापूर घटनेतील आरोपीला तातडीने अटकही करण्यात आली आहे तसेच या घटनेत निष्काळजीपणा दाखविणा-या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फही करण्यात आले आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्तीही करण्यात आली आहे. राज्य सरकारने तातडीने हे निर्णय घेतले असताना या घटनेच्या निमित्ताने 'बंद' च्या आडून राज्यात हिंसाचार करण्याची नीच खेळी महाविकास आघाडीकडून खेळली जात आहे. असा आरोप त्यांनी विरोधकांवर लावला.

यावेळी आमदार सौ. मेघना बोर्डीकर यानी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या राजवटीत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराची यादीच वाचून दाखवली. संभाजीनगर मध्ये मेहबूब शेख या सत्ताधारी पक्षाच्या युवा नेत्याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केला त्यावेळी त्याला अटक न करता संरक्षण दिले गेले. त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. विदर्भातील हिंगणघाटमध्ये भर दिवसा भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकाला अंगावर पेट्रोल टाकून जाळले गेले, तेव्हा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते. डोंबिवलीमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाला त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामुहिक बलात्कार यासारख्या सुमारे 11 घटना ऑगस्ट, 2020 मध्ये राज्यात घडल्या त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. अशा दुर्देवी घटनांचे राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यावेळी बंद पुकारला नव्हता. याची आठवणही आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी करून दिली. लाडकी बहिण योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते धास्तावले आहेत. काहीही करून लाडकी बहिण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून होत आहेत. बदलापूर येथे झालेल्या निदर्शनावेळी आंदोलकांकडून लाडकी बहिण योजनेचे पोस्टर झळकवण्यात येत होते. सामान्य नागरिकाकडून असे प्रकार केले जात नाहीत. आंदोलनामध्ये घुसलेल्या राजकीय शक्तींनीच लाडकी बहिण योजनेचे पोस्टर झळकावले होते, असेही आमदार सौ. मेघना बोडर्डीकर यांनी सांगितले.

2004 ते 2014 या काळात देशात यूपीए सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडीच्या सत्ता काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची यादी आमदार मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.

D24NEWS English News....

Bharatiya Janata Party(BJP) Jintur MLA Meghana Bordikar on Friday accused that opposition parties in state playing politics of Badlapur incident to stop Chief minister Majhi Ladkhi Bahin Scheme .

She also appealed to citizens should not fall prey to MVA's plot to create unrest .

Ch.sambhajinagar(Aurangabad), Aug 23,

Addressing a press conference here at BJP office she said that ,MVA constituent parties UBT, Congress and NCP Sharadchandra Pawar group, scared by the overwhelming response to the Chief Minister's Ladki Bahin Yojana, have started politics of Badlapur incident.

After Sharad Pawar predicted that Maharashtra would become Manipur, unrest and social unrest are spreading in the state, whether it is a coincidence or a planned ploy,she asked.

 Bordikar also appealed to maintain peace in the state without falling prey to the MVA's politics of calling for bandh and inciting violence.

She further said that, the Congress and Sharad Pawar group did not even protest the incident of torture on a woman doctor in Kolkata. Badlapur incident is very unfortunate. The state government is trying to ensure that the accused in this incident get hard punishment.

 The accused in the Badlapur incident has been immediately arrested and the police officers who showed negligence in the incident have also been dismissed. A Special Investigation Team (SIT) has been appointed under the leadership of a woman police officer and a special public prosecutor has also been appointed for the case to be processed in the fast track court,she said.

 While the state government has taken these decisions urgently, on the occasion of this incident, MVA is playing a vile game of violence in the state under the guise of 'bandh',She added.

On this occasion,Bordikar read out the list of numbers of atrocities incidents on women during the two and a half year rule of MVA state government led by Uddhav Thackeray including when Mehboob Sheikh, a youth leader of the NCP ruling party lured a woman on pretext to give job her and was raped on her in Sambhajinagar.

 BJP did not call a bandh at that time to politicize such unfortunate incidents,she remembered.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow