शहागंज येथे 35 अतिक्रमण निष्कासित, 30 हातगाडींचे साहित्य जप्त...
शहागंज परिसरात अतिक्रमण विरुद्ध मोठी कारवाई,
35 अतिक्रमण निष्कासित, 30 हातगाड्यांचे साहित्य जप्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सकाळी साडेदहा वाजेपासून शहरातील दाट वस्ती भाग असलेला शहागंज परिसरात कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई प्रथम दुकान समोर लावलेले अनधिकृत शेड ज्याच्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता अशा 35 अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. यानंतर किरण चव्हाण पासून महाराष्ट्र हिंदी विद्यालय कडे जाणाऱ्या रस्त्यावर एकूण 30 हातगागाडया विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. चार फळ विक्रेत्यांनी दहा बाय दहाचे ओटे करून व त्यावर कच्चे पक्के बांधकाम करून दुकाने मांडले होते ते जेसीबीच्या साह्याने निष्कर्षित करण्यात आली.
त्याचबरोबर शेख अमान या व्यक्तीने विद्युत डीपीच्या लगत पाच बाय सात 11 चे लोखंडी अँगल व पत्रे वापरून अतिक्रमण केले होते व स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करून घेतले म्हणून ते पण निष्कासित करून त्याच्याविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला तशी माहिती कळवली.
सदर अतिक्रमण पथकाने नंतर एका जनावराच्या गोठे रस्त्यामध्ये होते त्यापैकी दोन जनावरे जप्त केली व त्याचे चहाचे दुकान ज्याचे अंदाजे 15 बाय 10 चे शेड बांधकाम निष्कासित केले तसेच झुणका भाकर च्या नावाखाली एका व्यक्तीने एक चहा इडली नाष्टा हॉटेल व साहित्य विक्री बांधकाम साहित्य विक्री अशी दुकान थाटली होती ती पण जेसीबीच्या साह्याने निष्काशित करण्यात आले.
आज एकूण दिवसभर शहागंज भागात कारवाई करण्यात आली असून एकूण 25 व्यापाऱ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे नोटीस पण देण्यात आलेले आहे. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. शहागंज येथे एका गर्भवती महिला व सोबत कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आज पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. अतिक्रमण कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण होते तरीही अतिक्रमण विभागाने कारवाई यशस्वी करत व्यापा-यांना इशारा दिला असे वादविवाद झाले तर गंभीर कारवाई करण्याचा इशारा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिला आहे.
आजच्या कारवाई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशाने अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण विभाग सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक तीन शेख रफिक अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई, संजय सुरळकर, सागर श्रेष्ठ यांच्यासह पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी व त्यांचे पथक आणि माजी सैनिक पथकाने कारवाई
केली.
What's Your Reaction?