सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

 0
सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप...

विविध घोटाळे, भ्रष्टाचारांवर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काढले सरकारच्या कारभारावर धिंडवडे...

मुंबई, दि.17(डि-24 न्यूज) - राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्पर्धक कंपनीपेक्षा 3 हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

अनेक विभागात भ्रष्टचार वाढला आहे.. प्रचारात स्वच्छ प्रशासन म्हणतात मात्र दररोज घोटाळे बाहेर येतात.. सत्ताधारी मंत्री भ्रष्टाचार करत असताना काय करणार असा प्रश्न उपस्थित केला..

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून 

 राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारमधील मंत्र्यांचे समोर आलेल्या विविध घोटाळ्यांबाबत दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 

सरकारच्या विविध खात्यात भ्रष्टाचार

बोकाळलेला असून मंत्री कमिशन शिवाय कोणतं काम करत नसल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांचे हाल सुरू असून महिला भगिनींवर अन्याय आत्याचाराच्या घटना घडत असताना याबद्दल सरकारने मौन धारण केले असून फक्त

कंत्राट मिळवण्यात त्यांना रस असल्याची टीका दानवे यांनी केली. 

सत्ताधारी पक्षातील लोकं अनेक गुन्ह्यात सहभागी असून महिला अत्याचारातही सत्ताधारी पुढे आहेत. राज्यात गुत्तेदार आणि दरोडेखोर यांचे राज्य आले असून कोणत्याच गुन्हेगारांवर कारवाई होत नसून कायद्याचे पालन होत नसल्याबाबत दानवे यांनी गृह खात्यावर ताशेरे ओढले.

मागील पाच महिन्यात 1 लाख 69 हजार गुन्हे राज्यात घडले. 924 हत्या झाल्या असून दररोज 6 हत्या होतात. तर 3 हजार 506 बलात्कार झाले. या घटनांमध्ये जवळचे लोकं एवढे हिंमत का करतात ? असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री यांच्या नागपूर जिल्ह्यात 10 हजार 400 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुणे संभाजीनगर, नाशिक येथे अनेक मोठे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र 10 क्रमांकावर आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रीय असून भाईगिरी सुरू आहे.

पुण्यात सर्वांत जास्त सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून एका अधिकाऱ्याची 92 लाख रुपयांची फसवणूक झाली. सरकारने पोलीस भरतीचे फक्त आश्वासन दिले मात्र त्यावर अंमलबजावणी केली नसल्याचे दानवे म्हणाले.

अल्पवयीन मुलं, महिला अत्याचार, घरगुती अत्याचार यांचे प्रमाण 4 हजार 336 इतके वाढले झाले. 

वैष्णवी हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्ष यांनी हुंड्यासाठी छळ करून हत्या केली. सत्ताधारी मंडळी गुन्हे करतात हे अत्यंत निंदनीय असल्याची टीका दानवे यांनी केली. 

मस्साजोग घटनेतील फरार आरोपी, बीड जिल्ह्यातील 17 वर्षीय मुलीवर झालेला छळ, जिल्हा परिषद येथे 30 महिलांचा झालेला छळ, अमली पदार्थांचे खेड्यापाड्यात वाढत असलेले प्रमाण, ठाणे -मुंबई - पनवेल ते भिवंडी परिसरात परमिट रूमच्या माध्यमातून सुरू असलेले ड्रग्सचे धंदे यावर दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

संभाजीनगर येथे कीर्तनकार महिलेची दगडाने हत्या करण्यात आली. पनवेल भागातील गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी असून शासन याकडे गांभीर्याने बघत

नाही. राज्यात पोलिस संरक्षणाखाली अवैध व्यवसाय मोठया प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत गृहविभागावर दानवे यांनी जोरदार टीका केली.

मेंढपाळ बांधवांच्या रक्षणासाठी ऊस तोड कामगारांप्रमाणे कायदा करण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी करत राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची बेसुमार लूट सुरु असल्याबद्दल दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

  बनावट प्रमाणपत्र देऊन भूखंड बळकावले जात आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला अटक असताना सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याच पदावर नियुक्त करून सर्वसामान्य माणसाची लूट केली जात असल्याचा गंभीर दावा दानवे यांनी केला. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची 6832 हेक्टर जमीन शेतकऱ्यांची जमीन विरोध असताना घेतली जात आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना विमानतळाचा आग्रह धरणे चुकीचे आहे. या विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला असून राज्य सरकारला कसलाच धाक राहिला नसल्याचे दानवे म्हणाले. 

राज्य सरकार लिंगभेद करत आहे. वैद्यकीय विभागात 80 टक्के महिला आणि 20 टक्के पुरुषांची भरती केली जात आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही राज्य सरकारच्या या धोरणाला विरोध केला असून लिंगभेद करता या धोरणाचा फेरविचार करावा, अशी सूचना दानवे यांनी केली.

राज्य सरकारने उत्पादन शुल्क विभागाचे नियम बदलण्याचा घाट घातला आहे. 1972 पासून बंदी असलेल्या मद्य विक्री परवाने नव्याने सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकार 328 परवाने देत असून सत्ताधारी आमदारांना विदेशी दारू दुकानाचे परवाने देण्याची योजना आखत आहे का ? असा आरोप अंबादास दानवे यांनी केला..

राज्यातील 8 महसूली विभागात 328 परवाने देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही परवानगी देऊन आपले घर भरण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्राला मद्य राष्ट्र करून फुले शाहू आंबेडकर विचारसरणीला हे शोभणारे नसल्याचे दानवे म्हणाले...

धुळे जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात 1 कोटी 84 लाख रुपये पैसे सापडले. मात्र पोलिसांनी या गंभीर प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. विधिमंडळ अंदाज समितीच्या बैठकीत पैसे सापडले असताना अजूनही याप्रकरणी तपास पूर्ण झाला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर येथील वर्ग 2 ची बेकायदेशीर जमीन राज्यातील मंत्री संजय शिरसाठ यांनी खरेदी केली. शेंद्रा एमआयडीसी मधील ट्रक पार्किंगची राखीव बदलून भूखंड देऊन टाकला. पात्रतेचे नियम आणि पर्यावरणीय परवानगी नसताना हा भूखंड देण्यात आले असल्याने कुंपणच शेत खात असल्याचे दानवे म्हणाले.

शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. शाळांत आयडी घोटाळ्यात सरकार लक्ष देत नाही. संपूर्ण राज्यात हा घोटाळा घडला असून अनेक अधिकारी यांनी खोट्या सही करून हा घोटाळा केला असल्याचे दानवे म्हणाले..

ठाणे - बोरिवली टनेल प्रकल्पाचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करण्याचे सांगितले होते. 3 हजार 139 कोटींचे जास्त बोली लावलेल्या मेघा इंजिनिअरिंगल हा कंत्राट मिळाला. एल अँड टी कंपनीने कंत्राटाची कमी बोली लावून सुद्धा या कंपनीला हा कंत्राट मिळाला नाही.. राज्यात या कंपनीने हौदास घातला असून भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे दानवे म्हणाले.

   राज्यात सुरू असलेल्या विविध गैरव्यवहारावरून मंत्र्यांनी कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

  रस्ते फुटतात, शाळा पडतात निविदा मात्र हितचिंतकांना दिले जातात. आरोग्य केंद्र, 

 शाळा यात सुधारणा करण्याऐवजी 

मोठं चित्र दाखवले जात आहे मात्र जनता त्याला

चित्राला भुलणार नाही अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर टीका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow