वक्फ बोर्डाचे उत्पन्न झाले दहा कोटी, वक्फ बोर्डाचे चिकीत्सा महाविद्यालय बीड येथे होणार...!

 0
वक्फ बोर्डाचे उत्पन्न झाले दहा कोटी, वक्फ बोर्डाचे चिकीत्सा महाविद्यालय बीड येथे होणार...!

कोटींनी भरारी, उत्पन्न झाले दहा कोटी...

वक्फ बोर्डाचे पाहिले चिकित्सा महाविद्यालय बीड येथे होणार मुख्यमंत्री यांचा ग्रीन सिग्नल...

    ....अध्यक्ष समीर काझी यांची माहिती

सी.एस. नगर(औरंगाबाद) *महाराष्ट्र राज्य वक्फ मंडल तर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने एक पाऊल पुढे टाकणार आहे. वक्फचे राज्यातील पाहिले मल्टी स्पेशियलिटी चिकित्सा महाविद्यालय बीड येथे स्थापन होणार आहे.या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. लवकरच प्रस्ताव दाखल करून त्या दिशेने कार्यवाही करण्यात येईल. वक्फ मंडळाने गेल्या वर्षी उत्पन्नात दुपटीने वाढ झाली. वार्षिक पाचकोटी उत्पन्न आता दहा कोटी झाल्याची माहिती अध्यक्ष समीर काझी यांनी दिली.

राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपद सांभाळल्या नंतर अनेक बदल करण्यात आले आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, कामात गतिशीलता, लोकांना योग्य वेळी न्याय व योग्य समन्वय सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आम्ही वाटचाल करत असून त्या मुळेच पाच कोटीचे उत्पन्न दहा कोटीने वाढ झाली. वक्फचे प्रत्येक जिल्ह्यात प्रशस्त जिल्हा कार्यालयसुरू केल्या नंतर लोकांच्या मुख्यकार्यलयात चकरा मारणे बंद झाले. जिल्हा कार्यलयांना वक्फ फंड वसुलीसाठी नियोजन ठरवून देण्यात आले होते, जिल्हा कार्यलयात उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने आम्ही उत्पन्नात भरारी गाठली असल्याचे समीर काझी यांनी सांगितले.

चिकीत्सा महाविद्यालय सुरू करणे माझे स्वप्न...

वक्फ बोर्डाची स्थापणाच समाजाच्या खालच्या व तळागाळातील गोरगरीबांना फायदा व्हावा, लोककल्याणकारी कामे व्हावी हा उद्देश होता. त्याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने आम्ही चिकित्सा महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले आहे. या साठी मुख्यमंत्र्यांनी बीड दौऱ्यावर असतांना प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या मदतीचे माझे स्वप्न पूर्णत्वास येईल, अशी असा विश्वास ही समीर काझी यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसा पासून सुरू असलेल्या चिकित्सा महाविद्यालय सुरू व्हावे या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. सर्वप्रथम बीडमधील वक्फची कोणतीही एक जमीन निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर वक्फ बोर्डाच्या वतीने प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाशी देखील चर्चा होणार असुन त्यानंतर अंतीम प्रस्ताव पाठवण्यात येईल. या साठी महाराष्ट्र शासनाकडून वक्फ बोर्डाला मोठी मदत होणार आहे.    

राज्य शासनाच्या धर्तीवर वक्फचे सहा विभागीय कार्यालय...

***दरम्यान गेल्या तीन वर्षात महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम समीर काझी यांच्या माध्यमातून झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात वक्फ कार्यालय करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांची पदभरती करून प्रत्येक जिल्ह्याला क्लास वन अधिकारी देण्यात आला आहे. पुर्वी क्लार्क कडे हा पदभार असायचा मात्र आता कायमस्वरूपी अधिकारी देण्यात आल्याने कामांना गती आली आहे. कंत्राटी तत्वावर देखील कर्मचारी भरती करण्यात आली आहे. २५ ते ३० कर्मचार्‍यांवर वक्फ बोर्डाचा राज्याचा कारभार सुरू होता. तो आता २०० ते २५० कर्मचार्‍यांपर्यंत आला आहे. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने लोकांना सोईसुविधा मिळू लागल्या आहेत. लोकांची कामे वेळेवर होऊ लागली आहेत. राज्यात लवकरच वक्फ बोर्डाचे सहा विभागीय कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी विभागीय अधिकारी काम पाहणार आहेत. पुर्वी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच मुख्यकार्यकारी अधिकारी असायचे मात्र आता त्याच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली सहा विभाग असणार आहेत. महसूल प्रमाणेच वक्फचे सहा विभाग करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नागपूर-अमरावतीसाठी एक, मराठवाड्यात वक्फ संस्था जास्त असल्याने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड असे दोन विभागीय कार्यालये करण्यात येणार आहेत. 

 ---- दहा अधिकाऱ्यांचा प्रस्ताव लवकरच शासन कडे, आमूलाग्र बदल होणार....

 मुख्य कार्यालयात

 उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांच्या चार पदे निश्चित करण्यात आले असुन विभागीय अधिकारी आणि चार उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशा दहा अधिकार्‍यांच्या पदाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे वक्फच्या कामांना अधिक गती येणार असुन त्यातून उत्पन्न आणखी वाढू शकते. गेल्या दहा वर्षात झाले नाही एवढे अमुलाग्र आणि ऐतिहासिक बदल या तीन वर्षात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात झाले आहेत. तीन वर्ष सदस्य आणि आठ महिन्यापासून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करतांना समीर काझी यांनी वक्फ बोर्डाच्या कामात मोठी सुसूत्र

ता आणली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow